...अन् 'ते' पत्र बाहेर आलं; शरद पवारांनी 'लेटर बॉम्ब'च्या 'देवेंद्र कनेक्शन'कडे लक्ष वेधलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 03:42 PM2021-03-21T15:42:30+5:302021-03-21T15:44:35+5:30

ncp chief sharad pawar on timing of param bir singh letter and devendra fadnavis delhi visit: महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी बोलून देशमुखांच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय घेणार

ncp chief sharad pawar on timing of param bir singh letter and devendra fadnavis delhi visit | ...अन् 'ते' पत्र बाहेर आलं; शरद पवारांनी 'लेटर बॉम्ब'च्या 'देवेंद्र कनेक्शन'कडे लक्ष वेधलं

...अन् 'ते' पत्र बाहेर आलं; शरद पवारांनी 'लेटर बॉम्ब'च्या 'देवेंद्र कनेक्शन'कडे लक्ष वेधलं

Next

नवी दिल्ली: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. देशमुख यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लिहिलं आहे. यामुळे देशमुख यांच्यासह ठाकरे सरकारदेखील अडचणीत आलं असून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

"शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं"; फडणवीसांनी सांगितला 'त्या' घटनेचा पुढील भाग

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णय सर्वांशी चर्चा करुनच घेऊ. उद्यापर्यंत निर्णय घेतला जाईल. पण त्याआधी सर्वांशी चर्चा करण्यात येईल. गृहमंत्री अनिल देशमुख यांची बाजू जाणून घेऊनच निर्णय घेतला जाईल, असं शरद पवार यांनी सांगितलं. देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतली, असंदेखील पवारांनी स्पष्ट केलं. त्यामुळे उद्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का? शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले...

पत्राच्या टायमिंगकडे वेधलं लक्ष
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या कारचा तपास सुरू आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातही चौकशी सुरू आहे. या घडामोडी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला गेले आणि त्यानंतर लगेच काही दिवसांत परमबीर सिंग यांचं पत्र समोर आले, असं म्हणत पवारांनी 'लेटर बॉम्ब'च्या टायमिंगकडे लक्ष वेधलं.

मुंबई पोलिसांना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट; शरद पवार हसले 
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार, नाइट क्लब आणि रेस्टॉरंट्सकडून महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. तुम्हीही राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. खरंच असं काही टार्गेट मुंबई पोलिसांना असतं का? असा प्रश्न एका पत्रकारानं शरद पवार यांना विचारला. त्यानतंर पवार हसले आणि म्हणाले "हे तुम्ही मला काय मुंबई पोलिसांच्या कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला किंवा माजी अधिकाऱ्याला विचारलं तर तेही हसतील, असं पवार म्हणाले. 

Web Title: ncp chief sharad pawar on timing of param bir singh letter and devendra fadnavis delhi visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.