वाद चिघळला! "महिलेच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला अन् निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का?"

By प्रविण मरगळे | Published: February 15, 2021 03:15 PM2021-02-15T15:15:24+5:302021-02-15T15:19:28+5:30

NCP Jayant Patil Criticized BJP Chandrakant Patil over statement on Sharad Pawar: ज्या महिलेने मतदारसंघ लोकप्रियता मिळवली त्यावर 'आयत्या बिळावर नागोबा' सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे

NCP Jayant Patil Target BJP Chandrakant patil of criticism on Sharad Pawar | वाद चिघळला! "महिलेच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला अन् निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का?"

वाद चिघळला! "महिलेच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला अन् निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का?"

googlenewsNext
ठळक मुद्देविरोधी पक्षात आहात. जे काही आहे त्यावर रितसर बोलायला आमची तक्रार नाहीचुकीचं बोलणार्‍यांचं इनडायरेक्टली समर्थन करण्याचा स्वभावदेखील बरा नव्हेचंद्रकांत पाटील यांना पक्ष कसा टिकवायचा याची चिंता पडली आहे त्यामुळे पाहिजे ते वारेमाप बोलत सुटले आहेत

सांगली – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यातील वाद वाढत चालला आहे, शरद पवारांना माझ्याशिवाय करमत नाही, मी काहीच बोललो नाही तरीही माझ्यावर बोलतात असा चिमटा चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना काढला होता, त्यावरून आता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी चंद्रकांतदादांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (NCP Jayant Patil target BJP Chandrakant Patil over criticism of Sharad Pawar)    

याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, ज्या महिलेने मतदारसंघ लोकप्रियता मिळवली त्यावर 'आयत्या बिळावर नागोबा' सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे. विरोधी पक्षात आहात. जे काही आहे त्यावर रितसर बोलायला आमची तक्रार नाही पण चुकीचं बोलणार्‍यांचं इनडायरेक्टली समर्थन करण्याचा स्वभावदेखील बरा नव्हे असा खोचक टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला

तसेच चंद्रकांत पाटील यांना पक्ष कसा टिकवायचा याची चिंता पडली आहे त्यामुळे पाहिजे ते वारेमाप बोलत सुटले आहेत. पुण्यातल्या एका अतिशय चांगलं काम करणाऱ्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का? असा सवाल करत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका केली. मेधा कुलकर्णी यांनी त्यांचा मतदारसंघ जीवापाड जपला त्यांना बाजुला करुन प्रसंगी आपल्या अधिकाराचा वापर करून चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे स्वतःचा मतदारसंघ सोडून, स्वतःचा जिल्हा सोडून दुसरीकडे निवडणूक लढवावी लागली. त्या महिलेच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला असं जयंत पाटील म्हणाले.

काय आहे वाद?

पूजा चव्हाण तरूणीने आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) केल्याने शिवसेना आमदार आणि मंत्री संजय राठोड( Shivsena Sanjay Rathod) अडचणीत आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करावी आणि संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपाने केली आहे, यात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गप्प का? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना विचारला होता, त्यावर बोलताना पवारांनी ज्यांना आपलं स्वतःचं गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावं लागतं, अशा लोकांबद्दल मी बोलायचं का? असं सांगत त्यांची खिल्ली उडवली होती.

त्यावर चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं की, शरद पवारांना माझ्याशिवाय करमत नाही. मी त्यांच्याविषयी काही बोललो नाही, तरी ते माझ्याविषयी काही तरी बोलत असतात. त्यांनी राज्यातील बदनाम मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. त्यांना आम्ही परिपक्व नेते म्हणतो. तरीही ते काही कारवाई करीत नाहीत असा चिमटा चंद्रकांत पाटलांनी काढला होता, त्यावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

Web Title: NCP Jayant Patil Target BJP Chandrakant patil of criticism on Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.