डॉक्टरांवरील विधानामुळे वादात अडकलेल्या संजय राऊतांच्या मदतीला जितेंद्र आव्हाड धावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 01:13 PM2020-08-18T13:13:45+5:302020-08-18T13:16:36+5:30

मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या डब्ल्यूएचओ वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळेच कोरोना वाढला आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं.

NCP Jitendra Awhad Support over Shiv Sena MP Sanjay Raut controversial statement on doctors | डॉक्टरांवरील विधानामुळे वादात अडकलेल्या संजय राऊतांच्या मदतीला जितेंद्र आव्हाड धावले

डॉक्टरांवरील विधानामुळे वादात अडकलेल्या संजय राऊतांच्या मदतीला जितेंद्र आव्हाड धावले

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक प्रख्यात-डॉक्टरांनी, राष्ट्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या.अमेरिकेनेही WHO वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंध तोडले आहेत. संजय राऊत बोलले अन् वादळच आले, जितेंद्र आव्हाडांकडून राऊतांची पाठराखण

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊतडॉक्टरांबद्दल केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. संजय राऊतांनी माफी मागावी अशी आग्रही भूमिका डॉक्टरांच्या संघटनेने घेतली आहे. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील उडी घेतली आहे. याबाबत आव्हाडांनी ट्विट करत राऊतांवर टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्वासाहर्तेबद्दल अमेरिकेने प्रश्नचिन्ह निर्माण केले संबंधही तोडून टाकले. अनेक प्रख्यात-डॉक्टरांनी, राष्ट्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या. ह्या विषयावर कोणीही बोलताना दिसलेले नाही. संजय राऊत बोलले आणि वादळच आले असं सांगत त्यांनी राऊतांची पाठराखण केली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

शनिवारी संजय राऊत(Sanjay Raut Controversial Statement on Doctor) यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा एक गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या डब्ल्यूएचओ वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळेच कोरोना वाढला आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं.

संजय राऊत यांच्याविरोधात आयएमएची टीका

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर आज प्राणाची बाजी लावून काम करताहेत. अशा वेळी संजय राऊत यांनी कौतुक करणे तर सोडाच, पण त्यांनी डॉक्टरांपेक्षा कंपाउंडरना जास्त कळते, असे म्हणणे निषेधार्ह आहे. डब्ल्यूएचओवरही त्यांनी केलेली टीका अत्यंत अनाठायी आहे. राऊत यांनी देशभरातील डॉक्टरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याबाबत आम्ही विचार करीत आहोत अशा शब्दात इंडियन मेडिकल असोसिएशनने भावना व्यक्त केल्या होत्या.

राज्यातील डॉक्टरांचा नाराजीचा सूर लक्षात येताच, संजय राऊत यांनी आपल्या विधानावरुन यु टर्न घेतला होता.  मी WHO बद्दल बोललो, याचा अर्थ इथल्या डॉक्टरांचा अपमान केला असं नाही, मी नेहमीच डॉक्टरांचा सन्मान केला आहे. मी WHO बद्दल बोललो, मीच काय, ट्रम्प, रशिया किंवा अन्य देशांनीही WHO वर बोट ठेवलं आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा मतितार्थ पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. तर राऊतांच्या वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही टीकास्त्र सोडलं होतं. डॉक्टर हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा स्थितीत संजय राऊत यांचे वक्तव्य डॉक्टरांच्या जिव्हारी लागणारे आहे. असे वक्तव्य करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

Web Title: NCP Jitendra Awhad Support over Shiv Sena MP Sanjay Raut controversial statement on doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.