'मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील : नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 08:33 PM2021-02-08T20:33:12+5:302021-02-08T20:36:57+5:30

नारायण राणेंच्या जोडीला आता फडणवीस आले आहेत आणि त्यांनाही मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत, मलिक यांचा टोला

ncp leader devendra fadnavis criticize former cm devendra fadnavis and pm narendra modi farmers la protest | 'मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील : नवाब मलिक

'मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील : नवाब मलिक

Next
ठळक मुद्देनारायण राणेंच्या जोडीला आता फडणवीस आले आहेत, मलिकांचा टोलाफडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' ची स्वप्ने पूर्ण होणार नाही, मलिक यांचं वक्तव्य

'मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. "आम्ही फासे फिरवणार आहोत असे भाजप नेते सांगत आहेत. कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही, असाही उपरोधिक टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. 

"गेले २२ वर्ष नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे आणि फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' ची स्वप्ने पूर्ण होणार नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवताना सांगितले होते की सरकार पाच वर्षे नाही तर हे सरकार २५ वर्ष टिकणार आहे आणि तेच घडणार आहे," असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.



पंतप्रधानांवरही निशाणा

यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. "मोदींना आजपर्यंत कळलंच नाही की शरद पवार या देशातील कृषी सुधार पक्षकार होते. तेव्हाही आणि आताही ते कुठेतरी एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत होते आणि कृषीमंत्री असताना मॉडेल कायदा तयार करण्याची तयारी होती. आज जे तीन कायदे करण्यात आले. ते तिन्ही कायदे कॉनक्रस लिस्टमध्ये असताना केंद्रसरकारने मॉडेल कायदा केला नाही. राज्यसरकारांचे कायदे स्वतःकडे घेऊन कायदे पारित केले. कायदे जसेच्या तसे लागू करणे हे राज्यांवर बंधनकारक आहे. मला वाटतं हाच फरक मोदींना कळत नाही," अशी जोरदार टीका नवाब मलिक यांनी केली.

"आजचा कायदा आणि मॉडेल कायदा काय आहे यातील फरक मोदींनी समजून घ्यावा. अजून वेळ गेलेली नाही. सुधारणांच्या विरोधात राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नाही पण एकमत निर्माण करणे. लोकांना विश्वासात घेणे व सध्याचे कायदे आहेत त्यात बदल करणे हे गरजेचे असताना अजून टण्याची भूमिका पंतप्रधान करत असतील किंवा सरकार करत असेल तर ते योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले.नवीन सुधारणा करण्याबाबत कायदा तयार करायचा असेल तर सरकारने सर्व विरोधकांना बोलावून विश्वासात घेतलं पाहिजे," असंही मलिक म्हणाले. 

Web Title: ncp leader devendra fadnavis criticize former cm devendra fadnavis and pm narendra modi farmers la protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.