'सात वर्षे निव्वळ स्वप्ने दाखवली, पण एकही पूर्ण केलं नाही', नवाब मलिकांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 06:38 PM2021-05-31T18:38:18+5:302021-05-31T18:39:08+5:30
Nawab Malik : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात जी जी स्वप्ने दाखवली, त्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केली नाही, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.
मुंबई: नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली पण सात वर्षात मोदी सरकार सर्व स्तरांवर अपयशी ठरले आहे, असा आरोप काँग्रेसने करत मोदी सरकारच्या कारभाराचा निषेध केला. तर राष्ट्रवादीने भाजपा सरकावर टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात जी जी स्वप्ने दाखवली, त्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केली नाही, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे. (NCP slams PM Modi on his government's 7th anniversary)
यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. 'सात वर्षात महागाई कमी झाली नाही. पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत. लोकांच्या खात्यात 15 लाख रुपये आले नाहीत. दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देण्याचे जाहीर केले, त्यापैकी कुणालाच रोजगार मिळाला नाही. मोदींनी जी जी स्वप्ने दाखवली त्यातील एकपण पूर्ण केले नाही, अशी टीका मलिक यांनी केली आहे.
करोड़ों लोग रोजगार से वंचित हो गए। अर्थव्यवस्था पुरी तरह से चौपट हो गई है। हमें लगता है इससे बडी नाकामी कोई नही हो सकती। सात साल में महंगाई ज्यादा बढ़ गई, मानवी जीवन मे कोई बदलाव इन सात सालोंमे नाही आया, ये सच्चाई है, ऐसी टिपणी @nawabmalikncp जी ने की है।#7YearsOfFailure
— NCP (@NCPspeaks) May 31, 2021
याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन टर्म आणि केंद्र सरकारने सात वर्षे पूर्ण केली आहेत. मोदी दुसऱ्या टर्ममध्ये कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. वेळेत निर्णय घेण्यात आले नाहीत. वेळेत ज्या वस्तूंची आवश्यकता होती त्यावरही योग्य निर्णय घेतला नसल्याने कोट्यवधी लोक कोरोना बाधित झाले. तर लाखो लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना घडली, असे नवाब मलिक म्हणाले.
केंद्र सरकारने अपने कार्यकाल के सात साल पुरे किए है और प्रधानमंत्री मोदीजी ने अपने कार्यकाल के दुसरे चरण के दो साल पुरे किए है। इस समय केंद्र सरकार की विफलता पर राज्य के अल्पसंख्यक मंत्री श्री. @nawabmalikncp जी ने निशाना साधा है।#7YearsOfFailure#7yearsOfModiMadeDisasterpic.twitter.com/BkKZcs178E
— NCP (@NCPspeaks) May 31, 2021
'सामान्य लोकांच्या जीवनात कोणताच बदल झाला नाही'
कोट्यवधी लोक रोजगाराला मुकले. काही लोक बेरोजगार झाले. कित्येक लोकांना अर्ध्या पगारावर काम करावे लागले. अर्थव्यवस्था अक्षरशः चौपट आहे. यापेक्षा मोदी सरकारची नाकामी असूच शकत नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. सात वर्षात देशात गरीब गरीबच राहिला. बेरोजगारी वाढली. महागाई जास्त झाली. भाजपाच्या सात वर्षाच्या राजवटीत सामान्य लोकांच्या जीवनात कोणताच बदल झाला नाही ही सत्य परिस्थिती आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.