"माझ्यासवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 08:11 AM2021-02-18T08:11:55+5:302021-02-18T08:15:51+5:30

NCP MLA Amol Mitkari lashes out at BJP MLA Gopichand Padalkar: मी बोलू लागलो तर पळता भुई थोडी होईल; मिटकरींचा पडळकरांवर निशाणा

ncp mla amol mitkari indirectly slams bjp mla gopichand padalkar | "माझ्यासवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही"

"माझ्यासवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही"

Next

सांगली: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) आमनेसामने आले होते. त्यावेळी पडळकर यांनी मिटकरींवर जोरदार टीका केली होती. शिवचरित्र सांगून लाख-लाख रुपये कमावणारा बाजारू, अशा शब्दांत पडळकर यांनी मिटकरींना लक्ष्य केलं होतं. यानंतर आता मिटकरींनी पडळकरांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

कुत्ते भोंकते है... गोपींचंद पडळकरांना लक्ष्य करत जितेंद्र आव्हाडांची 'शायरी'

मी शिवचरित्र सांगितलं. फाट्यावर दारू तर विकली नाही ना. एखाद्या वृद्ध महिलेची २ कोटींची जमीन ५ लाखात तर हडप केली नाही ना?, असा सवाल मिटकरींनी सांगलीतल्या एका कार्यक्रमात भाषण करताना उपस्थित केला. मी बोलायला लागलो, तर संपूर्ण कुंडली तयार आहे. पण वेट अँड वॉच. समय जरुर आयेगा. ज्या दिवशी बोलेन, त्या दिवशी पळता भुई थोडी होईल, असं म्हणत मिटकरींनी पडळकरांना अप्रत्यक्ष इशारा दिला.

“पक्षाची वेठबिगारी करण्यासाठी विनाकारण चमकोगिरी करू नये”; गोपीचंद पडळकरांना सुनावलं

मोहनराव शिंदे साखर करखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांचा शिवचरित्र्य व्याख्यानाचा कार्यक्रम म्हैसाळ येथे आयोजित केला होता. यावेळी मिटकरी यांनी भाजप, केंद्र सरकार आणि पडळकरांवर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. माझ्यासवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही, अशा शब्दांत मिटकरींनी पडळकरांना लक्ष्य केलं. समोर कॅमेरे असल्यानं नाव न घेता बोलतो. तुम्ही गाळलेल्या जागा भरा, असंदेखील ते पुढे म्हणाले.

भुंकणाऱ्या कुत्र्याकडे बैल एकदा, दोनदा, तिनदा दुर्लक्ष करतो. पण चौथ्यांदा मात्र लाथ घालतो. मला आमदारकी देणारे आमचे गुरु सांगतात की विरोधासाठी विरोध करायचा नाही. शांत बसायचं. पण टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम करायचा, असं मिटकरी म्हणाले. काही जण म्हणतात, मिटकरी फक्त भाषणं करतात. हे बाजारू आहेत. त्यांना म्हणावं आज खरी भाषणं देतोय म्हणून आमदार झालोय. खोटी भाषण दिल्यास पंतप्रधानदेखील होता येतं, अशा शब्दांत मिटकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली.

Web Title: ncp mla amol mitkari indirectly slams bjp mla gopichand padalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.