"सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण, बिहार निवडणुकीसाठी केलं जातंय भांडवल", रोहित पवारांनी दिला पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 11:04 AM2020-09-07T11:04:31+5:302020-09-07T11:09:06+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण केलं जात असल्याचं म्हटलं आहे. 

ncp mla rohit pawar tweet on politics on sushant singh rajput death case | "सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण, बिहार निवडणुकीसाठी केलं जातंय भांडवल", रोहित पवारांनी दिला पुरावा

"सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण, बिहार निवडणुकीसाठी केलं जातंय भांडवल", रोहित पवारांनी दिला पुरावा

Next

मुंबई -  अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपयोग करून घ्यायची चलाख खेळी भाजपाने केल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी सुशांतसिंहची छायाचित्रे असलेले स्टीकर व मास्क भाजपाने तयार केले आहेत. यावरून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून भाजपावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील सुशांतच्या प्रकरणाचं वाईट राजकारण केलं जात असल्याचं म्हटलं आहे. 

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधीच एक ट्विट केले आहे. यामध्ये वृत्तपत्रांमध्ये आलेल्या काही बातम्या व भाजपाच्या निवडणूक प्रचाराचे पोस्टर ट्वीट करून त्यांनी या राजकारणाचा पुरावाच दिला आहे. तसेच बिहार निवडणुकीसाठी भांडवल केलं जात असल्याचं देखील म्हटलं आहे. "सुशांतसिंह राजपूत याच्यासाठी सर्व देश एकवटला असताना या विषयाचं वाईट राजकारण केलं जात असल्याचं व आधी बोलल्याप्रमाणे बिहार निवडणुकीसाठी भांडवल केलं जात असल्याचं दिसतंय. विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याचा हा अजेंडा आहे. पण या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत" असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. 

भाजपाच्या कला-संस्कृती विभागाच्या पाटणा शाखेने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची छायाचित्रे असलेले 30 हजार स्टीकर व मास्क तयार केले आहेत. सुशांतसिंहच्या छायाचित्राखाली ना भुले है! ना भुलने देंगे! अशी घोषणा लिहिलेले स्टीकर बिहारमध्ये काही ठिकाणी झळकत आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून ती २९ नोव्हेंबरच्या आधी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास हा विषय आता राष्ट्रीय पातळीवरही गाजत आहे व राजकारणाचा विषय झाला आहे. या तपासाच्या मुद्यावरून बिहार विरुद्ध महाराष्ट्रातील सरकार असाही संघर्ष झाला होता.

भाजपातर्फे सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा वापर, नवी प्रचारखेळी

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा भाजपा ज्या पद्धतीने वापर करू पाहत आहे, त्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठविली आहे, तर अनेकांनी भाजपला समर्थनही दिले आहे. एका नेटकऱ्याने ट्विटरवर लिहिले आहे की, सुशांतसिंहला न्याय मिळवून द्यायचा असेल तर भाजपालाच मतदान करा. आणखी एका नेटकऱ्याने टीका करताना म्हटले आहे की, सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अनेक जण तारस्वरात बोलत आहेत. त्यामुळे भाजपाला त्यातून राजकीय लाभ नक्कीच उठविता येईल. कदाचित कंगना राणावतला भाजपकडून निवडणुकीत उमेदवारीही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग! रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी

जिद्दीला सलाम! शिक्षणासाठी गर्भवतीने स्कूटरवरून केला 1200 किमीचा खडतर प्रवास अन्...

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! "2021 मध्येही असणार कोरोनाचं संकट, देशातील काही भागात दुसरी लाट"

माणुसकीला काळीमा! कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेत बलात्कार

धक्कादायक! खेळता खेळता एक वर्षाच्या चिमुकल्याने गिळलं सापाचं पिल्लू अन्...

Read in English

Web Title: ncp mla rohit pawar tweet on politics on sushant singh rajput death case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.