Maratha Reservation : "आजच्या निर्णयानं वाईट वाटलं, आता सत्ताधारी-विरोधकांनी राजकारण करू नये"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 01:12 PM2021-05-05T13:12:33+5:302021-05-05T13:21:09+5:30

NCP Rohit Pawar Reaction Over Maratha Reservation : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

NCP Rohit Pawar Reaction Over Maratha Reservation | Maratha Reservation : "आजच्या निर्णयानं वाईट वाटलं, आता सत्ताधारी-विरोधकांनी राजकारण करू नये"

Maratha Reservation : "आजच्या निर्णयानं वाईट वाटलं, आता सत्ताधारी-विरोधकांनी राजकारण करू नये"

Next

अहमदनगर : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे, त्यावर कोणीही राजकारण करू नये मराठा समाजातील युवावर्गाला काय मदत करता येईल याबाबत सत्ताधारी व विरोधकांना एकत्र बसून निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत दिली आहे.

रोहित पवार म्हणाले, मराठा आरक्षणाचा लढा हा मराठा समाजाने उभा केलेला एक मोठा लढा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते तर चांगलेच झाले असते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो. या न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिलेला आहे. पूर्वीच्या सरकारने जे विधी तज्ञ नेमलेले होते, तेच विधी तज्ञ याही सरकारने कायम ठेवलेले आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी याबाबत कुठल्या प्रकारचे राजकारण करू नये. 

मराठा समाजातील तरुण पिढीला शैक्षणिक उद्योग यासह विविध क्षेत्रामध्ये काय मदत करता येईल ,याबाबत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी बसून निर्णय घ्यावा कारण मराठा समाजाचा मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हा या समाजाने उभा केलेला एक मोठा लढा आहे. त्यामागे कुठल्याही प्रकारची राजकीय शक्ती नाही. तो एक समाजाचा प्रश्न आहे त्यामुळे या समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करण्याची आवश्यकता आहे; असेही रोहित पवार म्हणाले. 

"ठाकरे सरकारमधील मराठा नेत्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही, धिक्कार असो या नाकर्त्यांचा"

भाजपा नेते अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी यावरून आता  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. महावसुली आघाडी सरकारने सत्ता हातात घेतल्या दिवसापासून मराठा आरक्षणच्या विषयाचे पोतेरे केले" असं म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. "ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. त्यांना मराठा आरक्षणाच्या विषयाचे फक्त राजकारण करायचे आहे. त्यामुळेच हा विषय कोर्टात टिकला नाही. मराठा समाजावर घनघोर अन्याय झाला" असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. 

 

Web Title: NCP Rohit Pawar Reaction Over Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.