"खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवय"; रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 12:53 PM2021-07-10T12:53:43+5:302021-07-10T13:00:35+5:30
NCP Rohit Pawar Slams BJP Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई - सर्वसामान्यांच्या खिशावर इंधन दरवाढीचा भार आला असून अनेक राज्यात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. तर डिझेलच्या किमतीत देखील वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईत आज पेट्रोल 34 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 106.93 रुपये मोजावे लागतील. तर डिझेलच्या दरात वाढ 28 पैशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 97.46 रुपये आहे. याच दरम्यान पेट्रोलवर (Petrol) लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असं विधान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी पुण्यामध्ये केलं होतं. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवयच आहे" असं म्हणत रोहित पवार देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तसेच दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही असंही म्हटलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर करून भाजपाची चांगलीच पोलखोल केली आहे. "खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपाकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही" असं म्हटलं आहे.
खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही. pic.twitter.com/Mj02RkRobt
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 10, 2021
"केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या 32.90 रु पैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला 12 रु मिळत असल्याचे सांगतात" असं रोहित यांनी म्हटलं आहे. तसेच "विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी 12 रु दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही" असं देखील रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रु दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 10, 2021
इंधन दरवाढीचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल शंभरी पार
दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 35 पैशांनी वधारले आहेत. तर डिझेल 26 पैशांनी महागले आहे. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 100.91 रुपये आणि 89.88 रुपये मोजावे लागतील. भोपाळमध्ये पेट्रोल 109.24 रुपये तर डिझेल 98.67 रुपये आहे. तर कोलकातामध्ये लोकांना पेट्रोलसाठी 101.01 रुपये आणि डिझेलसाठी 92.97 रुपये मोजावे लागतील. दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लद्दाख आणि सिक्किममध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे.
Today's Fuel Price: इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले, पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले!#FuelPriceHike#PetrolDieselPriceHike#PetrolPriceHike#dieselprice#Mumbai#Delhi#Indiahttps://t.co/Mt5zOyq5eI
— Lokmat (@MiLOKMAT) July 10, 2021