"भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये", रोहित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 03:23 PM2020-11-16T15:23:23+5:302020-11-16T15:26:17+5:30

NCP Rohit Pawar And BJP : रोहित पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे. "भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

NCP Rohit Pawar slams BJP over temple reopening | "भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये", रोहित पवारांचा टोला

"भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये", रोहित पवारांचा टोला

Next

मुंबई - दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर अखेर राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली झाली आहेत. मात्र, कोरोनासंदर्भातील नियमावलीचे पालन करून मंदिरे खुली करण्याला परवानगी मिळाल्याने भाविकांसाठी सर्वार्थाने ही दिवाळी भेट ठरली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे. "भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "धार्मिक स्थळं उघडल्याचं श्रेय भाजपा पेढे वाटून घेत असल्याचं मला पत्रकारांनी सांगितलं. पण योग्य वेळी हा निर्णय घेणारं सरकार आणि कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करणारी अध्यात्मिक-धार्मिक क्षेत्रातील मंडळी, भाविक व जनतेचा हा विजय आहे. भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नये" असं रोहित यांनी म्हटलं आहे. तसेच "राज्यात धार्मिक स्थळं उघडण्यासाठी माझ्यासह इतरांनीही केलेल्या विनंतीनुसार आजपासून ती सुरू झाली आहेत" असं देखील म्हटलं आहे. 

रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघातील विविध मंदिरात जाऊन दर्शन घेतले. रोहित यांनी मतदारसंघात पहाटे खर्ड्यात संत सिताराम बाबा व संत गितेबाबा यांच्या समाधीची पूजा करून दर्शन घेतलं. जामखेडमधील नागेश्वर मंदिर आणि दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलं. तसेच कर्जतचं ग्रामदैवत सद्गुरु संत श्री. गोदड महाराज, राशीनला जगदंबा देवी आणि सिद्धटेकला गणरायाची भाविक आणि कार्यकर्त्यांसह मनोभावे पूजा आणि आरती केली. धार्मिक स्थळं उघडल्याने या परिसरातील व्यवसायांनाही चालना मिळेल. पण कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांकडं कुणीही दुर्लक्ष करु नये, ही विनंती केली आहे. 

पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर, शिर्डी, शेगाव यासह राज्यभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात आली. प्रत्येक मंदिरात सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग आदी उपाययोजनांची पूर्तताही करण्यात आली. दर्शनासाठी प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. मंदिरांमध्ये दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग सक्तीचे केले आहे. सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यानंतर आता दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू झाली आहे. 

Web Title: NCP Rohit Pawar slams BJP over temple reopening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.