"'या' चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं"; राष्ट्रवादीने मोदींना लगावला सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 02:27 PM2021-05-23T14:27:17+5:302021-05-23T14:38:01+5:30
NCP Slams Narendra Modi Over Corona virus And the Conversation Poll : कोरोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी झाली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सणसणीत टोला लगावला आहे.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 16 कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारतातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. एकून कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर पोहोचली आहे. तर दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान देशात कोरोनामुळे निर्माण झालेलली स्थिती, रुग्णालयातील बेडची कमतरता आणि ऑक्सिजनचा मोठा तुडवडा यावून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. विरोधकही विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत.
जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अमेरिकेतील 'द कॉन्व्हर्सेशन' वेबसाईटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली आहे. कोरोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी झाली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सणसणीत टोला लगावला आहे. या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. सर्वांत वाईट कामगिरीसाठी मोदींना एकूण (७५,४५०) ९० टक्के मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "'द कॉन्व्हर्सेशन' वेबसाइटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली. या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं. सर्वांत वाईट कामगिरीसाठी त्यांना एकूण (७५,४५०) ९० टक्के मतं मिळाली" असं म्हणत निशाणा साधला आहे.
अमेरिकेतील 'द कॉन्व्हर्सेशन' वेबसाइटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली. कोरोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी झाली. या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं. सर्वांत वाईट कामगिरीसाठी त्यांना एकूण (७५,४५०) ९० टक्के मतं मिळाली. pic.twitter.com/GSlGQPOwmC
— NCP (@NCPspeaks) May 22, 2021
"काही दिवसांपूर्वी 'द डेली गार्डियन' या लोकल वृत्तपत्राला ग्लोबल भासवून मोदी कसे चांगले काम करतात, हे दाखवायचा प्रयत्न भाजपने केला. त्या तुलनेत 'द कॉन्व्हर्सेशन' हे वृत्तपत्र मोठं आहे. त्यामुळे दखल घेणं क्रमप्राप्त ठरतं. या चाचणीत अव्वल आलेल्यांना शुभेच्छा!" असं देखील राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. कोरोना संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील विविध जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये विविध राज्यांचा अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र पश्चिम बंगालच्या एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Mamata Banerjee) हजर होत्या. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
CoronaVirus Live Updates : "आम्हाला कोरोना लसीची मागणी करायची होती, मात्र बोलूच दिलं नाही", ममतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल#CoronavirusIndia#coronavirus#CoronaVaccine#MamataBanerjee#NarendraModi#BJP#Politicshttps://t.co/MbQ40WhPSKpic.twitter.com/YuKkq5Mu0F
— Lokmat (@MiLOKMAT) May 20, 2021
"ना लस, ना धोरण, आम्हाला बोलूच नाही दिलं"; मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी भडकल्या, केले गंभीर आरोप
ममता यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ना लस, ना धोरण, आम्हाला बोलूच दिलं नाही असं म्हणत त्यांनी मोदींच्या बैठकीनंतर आपला संताप व्यक्त केला आहेत. तसेच केंद्राकडे ना कोणतं धोरण, ना कोणती उपाययोजना, असं असूनही बिगर भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही, असा आरोप केला. मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे."या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिलं नाही. मात्र भाजपाचे मुख्यमंत्री सोडता इतर मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विळखा! "आपल्याला दिसत असलेल्या आकडेवारीपेक्षा खरे आकडे दोन ते तीन पट जास्त"#coronavirus#CoronaSecondWave#Corona#CoronaVirusUpdate#WHOhttps://t.co/GigPdqvUbi
— Lokmat (@MiLOKMAT) May 21, 2021
भयावह! कोरोना मृतांची खरी आकडेवारी भलतीच; 60 ते 80 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता, WHOचा मोठा खुलासा
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. कोरोना महामारीत होणाऱ्या सर्वच मृत्यूंची नोंद झालेली नाही असं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सरकारी आकडेवारीनुसार जे आकडे आपल्यासमोर येत आहेत त्यापेक्षा खूप जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. WHO म्हणण्यानुसार आतापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, आत्तापर्यंत अधिकृत जगात 34.46 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. वार्षिक ग्लोबल हेल्थ स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट जारी करताना जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, कोरोनामुळे वर्ष 2020 मध्येच जवळपास 30 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जगातील विविध देशांनी केलेल्या नोंदीनुसार ही आकडेवारी 12 लाखांच्या आसपास आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोनावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसायक्लिन या गोळ्यांची दोन कोटींहून अधिक विक्री #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#Paracetamolhttps://t.co/tkxrZZSfCE
— Lokmat (@MiLOKMAT) May 21, 2021