"आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतात, की होम मिनिस्टर, हेच कळत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 01:29 PM2021-08-02T13:29:09+5:302021-08-02T13:29:27+5:30

Nilesh Rane on Shivsena: 'संजय राऊत धमकी द्यायला लागले, तुम्ही फटाके खाणारच आहात'

nilesh rane slams shivsena leader aadesh bandekar and sanjay raut | "आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतात, की होम मिनिस्टर, हेच कळत नाही"

"आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतात, की होम मिनिस्टर, हेच कळत नाही"

Next
ठळक मुद्दे'शिवसेनेचे संपादक धमक्या देत आहेत आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत'

मुंबई:शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर आता भाजपा नेते निलेश राणे शिवसेना आणि आदेश बांदेकर यांच्यावर निशाणा साधलाय. 'आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाहीत. आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो, की होम मिनिस्टर म्हणतो, हेच कळत नाही,'असे राणे म्हणाले.

निलेश राणे यांनी आज ट्विटरवर पोस्ट करुन शिवसेनेवर निशाणा साधला. 'शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, संजय राऊत मोजून बघा. मोबाईलची बटणं दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो की होम मिनिस्टर म्हणतो हेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संजय राऊत काय सांगतात,' अशा शब्दात त्यांनी सेनेवर टीका केली.

संजय राऊत फटके खाणारच...
त्याआधीही निलेश राणे यांनी एक ट्विट करत संजय राऊत आणि सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधला होता. 'हे काय ऐकतोय मी, की संजय राऊत धमकी द्यायला लागले, संजय राऊत तुम्ही फटाके खाणारच आहात, पण खास तुमच्यासाठी, तुम्हाला सेनाभवनच्या आत नेऊन फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देत आहेत आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत,' अशी टीका निलेश राणेंनी केली.

काय म्हणाल होते संजय राऊत ?
वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं विधान करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवसेनेनं अनुल्लेखानं मारलं आहे. यावर मी काय बोलणार. आमचे शाखाप्रमुख उत्तर देतील, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. लाड यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी सारवासारव सुरू केली. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, असं म्हणत लाड यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
 

Web Title: nilesh rane slams shivsena leader aadesh bandekar and sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.