"बिहारच्या आधीच पक्षप्रमुखांनी 'Vaccine' घेतलेली दिसते", नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By ravalnath.patil | Published: October 25, 2020 10:08 PM2020-10-25T22:08:25+5:302020-10-25T22:10:04+5:30
Nitesh Rane : उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखांनी लस घेतलेली दिसते, असे म्हणत ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
मुंबई : शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व, जीएसटी, बिहार निवडणूक, कोरोना लस, पाकव्याप्त काश्मीर या मुद्द्यांवरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखांनी लस घेतलेली दिसते, असे म्हणत ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. "बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी 'Vaccine' घेतलेली दिसते...जास्तच हवा भरलेली आज..किती आव..'टाचणी’ तैयार आहे..फक्त योग्य वेळ येऊन दया...,"असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
बिहार च्या अगोदरच पक्षप्रमुखानी “Vaccine” घेतलेली दिसते..
— nitesh rane (@NiteshNRane) October 25, 2020
जास्तच हवा भरलेली आज..
किती आव..
'टाचणी’ तैयार आहे..
फक्त योग्य वेळ येऊन दया..
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. आम्ही गुळाला चिकटलेले मुंगळे नाहीत. महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही, हे वाघांचं राज्य आहे. जो महाराष्ट्रच्या हिताच्या आडवा येईल त्याला आडवा पाडून गुडी उभी करणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
याचबरोबर, देशात कोरोनाचं संकट असताना त्यांना राजकारण सूचतंय. निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये मोफत कोरोनाची लस देण्याची घोषणा करता. मग उर्वरित भारत काय बांगलादेश आहे का? त्यांच्याकडून पैसे घेणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
नारायण राणेंवर उद्धव ठाकरेंचा निशाणा
भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून नारायण राणे आणि नितेश राणे सातत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी तितक्याच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले. राज्यात काही जणांना इंजेक्शन देणे गरजेचे असते ते आम्ही देतो. बेडके किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झालाय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
- हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा.
- वाटेला जात तर मुंगळा कसा डसतो, ते दाखवू.
- वाघाची अवलाद आहे, डिवचाल तर पस्तवाल.
- महाराष्टाच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या छाताडावर गुढी पाडवा साजरा करेन.
- मला संयमचे महत्त्व कळतं.
- मी आज मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून टाकलाय.
- वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर फटका मारणारचं.
- घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व.
- बाबरी वेळी शेपट्या घालणारे हिंदुत्त्वावर प्रश्न विचारतायेत.
- इथे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता, गोव्यात गोवंश बंदी का नाही
- सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या, भाजपाला टोला
- राजकारण म्हणजे शस्त्रूमधील युद्ध नव्हे, हे सरसंघचालकाकडून शिकावे.
- गोव्यात गोवंश हत्येला बंदी का नाही? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल
- देश संकटात आहे आणि हे राजकरण करत आहे.
- कोरोना आहे, संकटं आहेत, जीएसटी नाही, पैसे येणार कुठून?
- आमचा जीएसटीचा निधी केंद्र सरकार का देत नाही?
- जीएसटी सदोष असेल तर मोदींनी मागे घ्यावी .
- सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी करावी.
- जीएसटी फेस गेली असेल तर पंतप्रधानांनी माफी मागावी..
-संघमुक्त भारत म्हणणारे नितीश कुमार चालतात
- दानवेंचा बात दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही.
- सेक्युलरपणाची लस कुणी कुणाला?
- दानवेंचा बात दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही.
- घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं.
- बिहारमध्ये मोफत लस, मग आम्ही काय बांगलादेशचे?
- महाराष्ट्र पुढं जातोय म्हणून बदनामी करायची.
- मला माझ्या पोलीस दलाबद्दल अभिमान आहे .
- छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान.
- मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे .
- घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, उद्धव ठाकरेंचा कंगनावर प्रहार
- आमच्या अंगणात तुळशीची वृंदावने आहेत, गांजाची वृंदावने नाहीत.
- आमच्या अंगावरती येत आहात,महाराष्ट्र द्वेष पाहिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो, सावध राहा .
- आदित्य, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक झाली हे भयंकर होतं. बिहारच्या सुपुत्रार चिखलफेक करणारे महाराष्ट्राच्या सुपुत्रावर चिखलफेक करतायेत.
- तुम्ही रातोरात झाडांची कत्तल करत होता, आम्ही ८०८ एकराचं जंगल वाचवलं, एक रुपया खर्च न करता मेट्रो कारशेड उभारतोय
- बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत; उद्धव ठाकरेंचा राणे कुटुंबीयांवर प्रहार
- केवळ पाडापाडी करण्यात भाजपा रस आहे, ही अराजकता आहे
- विरोधक म्हणजे अहंकारी राजा आणि कळसुत्री बाहुल्या आहेत
- महाराष्ट्र आता कळसुत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही.