नितीन गडकरींनी शब्द पाळला! मनसे आमदारानं केलेली ‘ही’ मागणी अवघ्या २ महिन्यात मान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 02:18 PM2021-05-05T14:18:19+5:302021-05-05T14:20:30+5:30

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी १७ एप्रिलला आमदार राजू पाटील यांना पत्र पाठवलं होतं.

Nitin Gadkari kept his word! This demand made by MNS MLA Raju Patil was accepted in just 2 months | नितीन गडकरींनी शब्द पाळला! मनसे आमदारानं केलेली ‘ही’ मागणी अवघ्या २ महिन्यात मान्य

नितीन गडकरींनी शब्द पाळला! मनसे आमदारानं केलेली ‘ही’ मागणी अवघ्या २ महिन्यात मान्य

googlenewsNext
ठळक मुद्देराजू पाटील यांनी नागपूरात जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली होतीडोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा असा रेल्वे समांतर रस्त्याचा प्रश्न सन २००९ पासून प्रलंबित आहे.सध्या एखाद्या जवळच्या राष्ट्रीय महामार्गा अंतर्गत येणाऱ्या रस्त्याला निधी देतो’असा शब्द पण गडकरींना दिला होता

कल्याण – मनसे आमदार राजू पाटील यांनी जानेवारी महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी डोंबिवली-मुंब्रा रेल्वे समांतर रस्ता व्हावा अशी मागणी केली होती. त्याचसोबत सदर रस्त्याचा ‘राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा (लिंक) प्रस्ताव पाठवा बाकी मी बघतो असं आश्वासन दिलं होतं. तसेच सध्या एखाद्या जवळच्या राष्ट्रीय महामार्गा अंतर्गत येणाऱ्या रस्त्याला निधी देतो’असा शब्द पण गडकरींना दिला होता. तो शब्द अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पाळला आहे. याबद्दल आमदार राजू पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी १७ एप्रिलला आमदार राजू पाटील यांना पत्र पाठवलं होतं. या पत्रात म्हटलं होतं की, माझ्या विभागानं २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात कल्याण ग्रामीण विभागात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी निधी मंजूर केला आहे. त्या अंतर्गत कल्याण ते निर्मल रोडच्या दुरुस्ती आणि निर्मितीसाठी ४८.६१ कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे.

राजू पाटील यांनी नागपूरात जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली होती. यावेळी राजू पाटील यांनी गडकरींना पत्र दिलं होतं. या पत्रात म्हटलं होतं की, डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा असा रेल्वे समांतर रस्त्याचा प्रश्न सन २००९ पासून प्रलंबित आहे. तत्कालिन आमदार स्व.हरिश्चंद्र पाटील यांनी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न करुन सतत पाठपुरावा केला होता. त्यावेळी या रस्त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करुन एमएमआरडीएने ९३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती.परंतु त्यानंतर या रस्त्याचा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला असून अद्यापही गती मिळालेली नाही.सध्या कोरोनामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे रस्ते वाहतुकीचे महत्त्व सर्वांना कळत आहे. दिवा, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली परिसरातील नागरिकांना कल्याण-शिळ रस्त्यावर अवलंबून रहावे लागत असून या रस्त्यावर प्रचंड वाहतुक कोंडी होत असते.

सर्व तांत्रिक अडचणीवर मात करुन पर्यावरणाचा समतोल राखून, खासगी जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन हा रस्ता पूर्ण करणे शक्य आहे. तरी  डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी करण्याबरोबरच रेल्वे प्रवाशांना सोयीस्कर पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. वास्तविक हा रस्ता झाला तर डोंबिवली ते मुंब्रा हे अंतर ५ ते ७ मिनिटांवर येईल. परंतु मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नुकतेच खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी. चे अंतर फक्त ६ कि.मी. ने कमी होऊन १३.३ कि.मी. इतके होईल. त्यासाठी ₹ ६६०० कोटी खर्च करणाऱ्या टरफऊउ ला दुर्दैवाने सदर रस्ता लवकर व्हावा हे आवश्यक वाटले नाही. आणि म्हणूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ह्यभिवंडी-नाशिक राष्ट्रीय महामार्ग व ठाणे-पनवेल राष्ट्रीय महामार्ग (मुंब्रा येथे जोडून ) या दोन्ही रस्त्यांना मानकोली-डोंबिवली-दिवा-मुंब्रा असे जोडून सदरचे प्रकल्प केंद्रीय स्तरावर राबविण्यात यावा ही विनंती केली.यामुळे भविष्यात ह्या रस्त्याला मंजुरी मिळाली तर नक्कीच ठाणे पलीकडील प्रवाश्यांना फायदा होणार आहे असल्याचं राजू पाटील म्हणाले होते.

Web Title: Nitin Gadkari kept his word! This demand made by MNS MLA Raju Patil was accepted in just 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.