Nitin Raut: 'अहंकाऱ्यांनो जरा शिका', मंत्री नितीन राऊत यांचा व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान मोदींवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 04:09 PM2021-06-09T16:09:17+5:302021-06-09T16:10:15+5:30
देशात आता २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांचं कोरोना विरोधी लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे.
देशात आता २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांचं कोरोना विरोधी लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. केंद्राच्या घोषणेचं सर्वस्तरातू स्वागत होत असतानाच काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला आहे.
"आमचे नेते राहुल गांधी यांनी सुरुवातीलाच रस्ता दाखवला होता. राहुल गांधी कोरोनाच्या सुरुवातीपासूनच सरकारला खबरदार करत होते. तसंच योग्य सल्लाही देत होते. अहंकाऱ्यांनो, जरा शिका", असं ट्विट नितीन राऊत यांनी केलं आहे.
हमारे नेता @RahulGandhi ने पहले ही रास्ता दिखा दिया था।
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) June 9, 2021
मा. राहुल गांधी कोरोना की शुरुआत से ही सरकार को ख़बरदार भी कर रहे हैं और उचित सलाह भी दे रहे हैं।
अहंकारियों सीखो!@INCIndia#CoronaVaccinepic.twitter.com/FVuz5DBPsb
नितीन राऊत यांनी ट्विट केलेल्या व्यंगचित्रात राहुल गांधी यांचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी चालत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यात राहुल गांधी यांनी केलेल्या एका ट्विटचाही उल्लेख करण्यात आला आहे. कोरोना लसीची खरेदी पूर्णपणे केंद्राने करावी आणि त्याचं वितरण राज्यांनी करावं तेव्हाच लस प्रत्येक गावापर्यंत सुरक्षित पद्धतीनं पोहोचेल, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.
२१ जूनपासून देशात मोफत लसीकरण
देशात कोरोना विरोधी लसीकरणात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारांना देण्यात आली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांवर सोपविण्यात आलेली २५ टक्के लसीकरणाची जबाबदारी देखील आता केंद्र सरकार घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. येत्या २१ जूनपासून देशात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राज्यांना केंद्राकडून मोफत लस उपलब्ध करुन दिली जाईल अशी घोषणा मोदींनी केली आहे.