"अशा कितीही कारवाया झाल्या तरी आम्ही सहन करु, पण...", रावसाहेब दानवेंची राज्य सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 06:55 PM2021-07-05T18:55:05+5:302021-07-05T18:58:37+5:30
Raosaheb Danve : तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. याबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या चर्चेचं पर्यवसान आधी शाब्दिक वादात, आरोप-प्रत्यारोपात, नंतर गदारोळात आणि पुढे अक्षरशः राड्यात झाल्याचे पाहायला मिळाले. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केलेल्या आमदारांच्या निलंबनाचा ठराव अनिल परब यांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. निलंबनाच्या कारवाईत आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, याबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी या निलंबनाच्या कारवाईवरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
यासंदर्भात रावसाहेब दानवे यांनी ट्विट केले आहे. अशा प्रकारच्या कितीही कारवाया झाल्या तरी आम्ही सहन करु, पण ओबीसी समाजाला न्याय मिळेपर्यंत भाजपाचा संघर्ष सुरुच राहील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, रावसाहेब दानवे यांनी ट्विट करत अशा प्रकारची कारवाई होणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. "ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही झगडत असतांना, आमच्या लोकांवर अशा प्रकारची कारवाई होणे चूक आहे. अशा प्रकारच्या कितीही कारवाया झाल्या तरी आम्ही सहन करु, पण ओबीसी समाजाला न्याय मिळेपर्यंत भाजपाचा संघर्ष सुरुच राहील,” असे रावसाहेब दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही झगडत असतांना, आमच्या लोकांवर अश्या प्रकारची कार्यवाही होणे चूक आहे. अश्या प्रकारच्या कितीही कार्यवाह्या झाल्या तरी आम्ही सहन करु, पण ओबीसी समाजाला न्याय मिळेपर्यंत भाजपाचा संघर्ष सुरुच राहील.#MonsoonSession#OBC@BJP4Maharashtra
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) July 5, 2021
दरम्यान, आज विधानसभेत ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारविरोधात ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. यानंतर ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजपा आमदार आक्रमक झाले. भाजपा आमदारांनी वेलमध्ये उतरुन विधानसभाध्यक्षांच्या माईकला हात लावला. भाजपाकडून ओबीसींची दिशाभूल करत असून ओबीसी मुद्द्यावर विरोधकांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की केली. दरम्यान, ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
'तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबरानं लिहिलं जाईल', भाजपा आमदाराचा हल्लाबोल https://t.co/3TRvGQVOYx@BJP4Maharashtra@BJP4India@ShivSena@BhatkhalkarA#MaharashtraAssemblySession2021#Atulbhatkhalkar
— Lokmat (@MiLOKMAT) July 5, 2021
लंबन झालेल्या आमदारांची नावे-
१. संजय कुटे
२. आशिष शेलार
३. गिरीश महाजन
४. पराग अळवणी
५. राम सातपुते
६. अतुल भातखळकर
७. जयकुमार रावल
८. हरीश पिंपळे
९. योगेश सागर
१०. नारायण कुचे
११. कीर्तीकुमार (बंटी) बागडिया
१२. अभिमन्यू पवार