उत्तर पूर्व मुंबईत युतीला इंजिन धडकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 01:04 AM2019-04-18T01:04:57+5:302019-04-18T01:05:30+5:30

मराठीबहुल असलेल्या उत्तर पूर्व मुंबईत मनसेचे इंजिन टिकटिकनुसार सुरू झाल्यामुळे ते युतीला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

In the north east Mumbai, will the engine be hit? | उत्तर पूर्व मुंबईत युतीला इंजिन धडकणार?

उत्तर पूर्व मुंबईत युतीला इंजिन धडकणार?

Next

मुंबई : मराठीबहुल असलेल्या उत्तर पूर्व मुंबईत मनसेचे इंजिन टिकटिकनुसार सुरू झाल्यामुळे ते युतीला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या १० वर्षाच्या काळात, मनसेचा प्रभाव जरी कमी झाला असला तरी, आजही काही भागात राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा गट काम करत आहेत. मात्र तो मतांवर किती फरक पाडू शकतो हे निकालावरुनच स्पष्ट होईल.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सोमय्या येथून तीन लाख मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर, माजी आमदार मंगेश सांगळे, राम कदम यांनी कमळ तर, शिशिर शिंदे यांनी धनुष्यबाण उचलले. त्यामुळे फाटाफूट झाली. मात्र, तरी देखील मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर या भागातील मावळत चाललेल्या मनसे कार्यकर्त्यांनी काम सुरु ठेवले. या मतदार संघात सर्वाधिक मराठी मतदार आहे. त्यापैकी बरेच जण आजही बरेचजण मनसेशी एकनिष्ठ आहेत. आघाडीच्या प्रचारात मनसे उतरल्याने, दोन्हीही उमेदवार मतांवर किती फरक पडेन याचा हिशोब लावताना दिसत आहे. अखेरच्या टप्प्यात या भागात राज ठाकरे यांची सभा झाल्यास मतांवर आणखीन फरक पडू शकेन याची शक्यताही नाकारता येत नाही. मनसेचे पदाधिकारी प्रचारा उतरुन मराठी मतदारांना वळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, युतीकडून सर्वोपत्तरी मराठी मत स्वत:कडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
>मनसेने लढवलेल्या इतर निवडणुकांचे काय झाले?
२००९ मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून मनसेच्या शिशिर शिंदे यांनी १.९५ लाख मते घेतली. या मतांच्या फरकामुळे किरीट सोमय्यांचा पराभव होत, राष्ट्रवादीचे संजय पाटील यांचा विजय झाला.सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतील भांडुपसह विक्रोळी, घाटकोपर पश्चिम मतदार संघ मनसेने काबीज केले. भांडुप, घाटकोपर पश्चिम, विक्रोळीतून मनसेचे ३ आमदार निवडून आले होते. मात्र, २०१४ मध्ये मनसेची पिछेहाट झाली.

Web Title: In the north east Mumbai, will the engine be hit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.