तो असं करू शकत नाही; गंभीरच्या पाठीशी हरभजन, लक्ष्मण खंबीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 03:00 PM2019-05-10T15:00:35+5:302019-05-10T15:02:05+5:30

आप उमेदवाराबद्दल अपमानास्पद मजकूर असलेली पत्रकं वाटल्याचा आरोप

Obscene Pamphlet Row Harbhajan Singh vvs laxman Backs East Delhi Bjp Candidate Gautam Gambhir | तो असं करू शकत नाही; गंभीरच्या पाठीशी हरभजन, लक्ष्मण खंबीर

तो असं करू शकत नाही; गंभीरच्या पाठीशी हरभजन, लक्ष्मण खंबीर

Next

नवी दिल्ली: पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना यांच्याबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रकं वाटल्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणी आपच्या उमेदवार आतिशी यांनी दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गंभीरविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं असताना गंभीरचे दोन माजी सहकारी त्याच्या मदतीसाठी धावले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू हरभजन सिंह यांनी गंभीरसाठी बॅटिंग केली आहे. 

गौतम गंभीर महिलांविरोधात चुकीचं बोलणार नाही, असा विश्वास हरभजन सिंगनं व्यक्त केला. 'मी काल (गुरुवारी) गौतम गंभीरशी संबंधित एक प्रकरण ऐकलं. ते ऐकून मला धक्काच बसला. मी त्याला खूप चांगलं ओळखतो. तो कधीही महिलांविरोधात चुकीचं बोलणार नाही. तो निवडणुकीत जिंको अथवा पराभूत होवो, माणूस म्हणून तो खूप चांगला आहे,' असं ट्विट करुन हरभजननं गंभीरची बाजू घेतली आहे.




माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणनंदेखील ट्विट करुन गौतम गंभीरवरील आरोपांवर विश्वास बसत नसल्याचं म्हटलं. 'काल (गुरुवारी) ऐकलेल्या गोष्टी ऐकून मी स्तब्धच झालो. गौतमला मी 2 दशकांपासून ओळखतो. त्याच्या मनात महिलांबद्दल आदर आहे. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल मी खात्री देऊ शकतो,' असं लक्ष्मणनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 




पूर्व दिल्ली मतदारसंघात आपच्या आतिशी मार्लेना आणि भाजपाचे गौतम गंभीर अशी लढत आहे. मतदासंघातल्या काही ठिकाणी आतिशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रकं वाटण्यात आली. यामागे भाजपा आणि गौतम गंभीर असल्याचा आरोप मार्लेना यांनी केला. गंभीर एखाद्या सशक्त महिलेविरोधात अशा प्रकारची पत्रकं वाटू शकतात. तर ते महिलांना काय सुरक्षा देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

Web Title: Obscene Pamphlet Row Harbhajan Singh vvs laxman Backs East Delhi Bjp Candidate Gautam Gambhir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.