UP Election 2022: “उत्तर प्रदेशची जनता भाजपला कंटाळलीय, आम्ही ५ वर्षांत ५ मुख्यमंत्री देऊ”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 12:13 PM2021-06-25T12:13:56+5:302021-06-25T12:23:10+5:30
UP Election 2022: जनतेने संधी दिल्यास ५ वर्षांत ५ मुख्यमंत्री आणि २० उपमुख्यमंत्री देऊ, असे ओमप्रकाश राजभर यांनी म्हटले आहे.
लखनऊ: पुढील वर्षी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी विविध पक्षांकडून आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, राजकारण हळूहळू तापताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता अनेक पक्षांनी भाजपविरोधात मोट बांधायला घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. उत्तर प्रदेशची जनतेला भाजपला कंटाळली आहे. जनतेने संधी दिल्यास ५ वर्षांत ५ मुख्यमंत्री आणि २० उपमुख्यमंत्री देऊ, असे ओमप्रकाश राजभर यांनी म्हटले आहे. (omprakash rajbhar says we will give 5 cm and 20 deputy cm in 5 years after up election)
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओमप्रकाश राजभर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, भाजपसोबत युती करणार नाही. तसचे एनडीए मध्ये सहभागी होणार नसल्याचे यापूर्वीच म्हटले होते. यानंतर आता ओमप्रकाश राजभर यांनी अजब दावा करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. जर उत्तर प्रदेशमध्ये आमच्या पक्षाचे सरकार आले, तर ते वेगवेगळ्या जातीच्या नेत्यांना संधी देण्यात येईल. पाच वर्षांत पाच मुख्यमंत्री आणि प्रत्येक वर्षांत चार उपमुख्यमंत्री बनवले जातील, असे म्हटले आहे.
मेहबुबा मुफ्तींचे PM मोदींच्या बैठकीत वेगळेच ‘रागरंग’; पाकिस्तानचे नावही घेतले नाही!
उत्तर प्रदेशची जनतेला भाजपला कंटाळली
उत्तर प्रदेशची जनतेला भाजपला कंटाळली आहे. आताच्या घडीला भाजपला कोणी मतदान करणार नाही. याचा परिणाम लवकरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल, असा दावा करत राजभर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. यावेळी राजभर यांनी निषाद पक्षाच्या संजय निषाद यांच्या मुलावरही जोरदार निशाणा साधला. तुम्ही भाजपाकडे भीक का मागत आहात. त्याऐवजी तुम्ही आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, असे राजभर म्हणाले.
राज्य सहकारी बँकेची दमदार कामगिरी; कोरोना काळात ३६९ कोटींचा निव्वळ नफा
भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘डूबती नैया’
भाजप हे एक बुडते जहाज आहे. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, त्यांनी जावे. पण आम्ही जाणार नाही. जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच भाजपला लहान पक्ष आणि मागासवर्ग समाजाची आठवण होते. मागासवर्ग समाजाला सामावून न घेणारी भाजप कोणत्या तोंडाने मते मागायला जाणार आहे, अशी विचारणा करत भाजपला पराभूत करण्यासाठी भागीदारी संकल्प मोर्चा तयार करण्यात आला असून, आमचा त्यांना पाठिंबा असेल, असे राजभर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.