"अजून एका मंत्र्याचा पर्दाफाश करणार, पुढच्या आठवड्यात तिसरा राजीनामा होणार’’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 12:03 PM2021-04-06T12:03:48+5:302021-04-06T12:05:51+5:30

Chandrakant Patil News : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अजून एका मंत्र्याच्या पर्दाफाश होणार असून, पुढच्या आठवड्यात सरकारमधून तिसरा राजीनामा येईल, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

"One more minister will be exposed, a third will resign next week." - Chandrakant Patil Claim | "अजून एका मंत्र्याचा पर्दाफाश करणार, पुढच्या आठवड्यात तिसरा राजीनामा होणार’’ 

"अजून एका मंत्र्याचा पर्दाफाश करणार, पुढच्या आठवड्यात तिसरा राजीनामा होणार’’ 

Next

पुणे - गेल्या सव्वा महिन्याच्या काळात राज्य सरकारमधील संजय राठोड (Sanjay Rathod) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) या दोन बड्या नेत्यांना गंभीर आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) चांगलेच अडचणीत सापडले आहे. सरकारमधील दोन मोठ्या मंत्र्यांचा राजीनामा झाल्याने विरोधा पक्ष असलेला भाजपा (BJP) आता कमालीचा आक्रमक झाला आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अजून एका मंत्र्याच्या पर्दाफाश होणार असून, पुढच्या आठवड्यात सरकारमधून तिसरा राजीनामा येईल, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ("One more minister will be exposed, a third will resign next week", Chandrakant Patil Claim)

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अजून एका मंत्र्याच्या पर्दाफाश होणार असून, पुढच्या आठवड्यात सरकारमधून तिसरा राजीनामा येईल. मात्र हा मंत्री कोण हे मात्र सांगणे चंद्रकांत पाटील यांनी टाळले. तसेच तो मंत्री कोण हे तुम्ही शोधून काढा असा सल्ला त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला. तसेच हा मंत्री कुठल्या पक्षाचा आहे असे विचारला असता तो मंत्री कुठल्या पक्षाचा आहे हे आपल्याला ठावून नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देणे टाळले. त्यामुळे त्यामुळे आता संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर आता कुणाला राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

दरम्यान,  राज्यामधील राजकीय वाटचालीबाबत आम्ही धोरण निश्चित केले आहे. आता आम्हाला राज्यात कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही यापुढे स्वबळावर निवडणुका लढवणार. २०२४ मध्ये दोन कोटी मतांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. तसेच आम्हाला कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही स्वबळावर निवडणून लढवून २०२४ मध्ये सरकार स्थापन करू, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Web Title: "One more minister will be exposed, a third will resign next week." - Chandrakant Patil Claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.