रात्री एक वाजता 'घरांच्या प्रश्नांबाबत' अनेक महिला जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतात तेव्हा…

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 03:15 PM2021-01-29T15:15:49+5:302021-01-29T15:36:55+5:30

Jayant Patil : जयंत पाटी हे सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यावर असून गुरुवारी रात्री एक वाजता या महिलांनी त्यांची भेट घेऊन ही मागणी केली.

At one o'clock in the night, when many women meet the Water Resources Minister Jayant Patil on 'housing issues' | रात्री एक वाजता 'घरांच्या प्रश्नांबाबत' अनेक महिला जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतात तेव्हा…

रात्री एक वाजता 'घरांच्या प्रश्नांबाबत' अनेक महिला जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतात तेव्हा…

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिक्युरिटीच्या गराड्यातून आपला ताफा थांबवत जमलेल्या महिलांची भेट घेतली.

चंद्रपूर : आम्हाला हक्काचे आणि अधिकृत घर हवे, या मागणीसाठी चंद्रपूर जिल्हयातील मूल शहरातील अनेक महिलांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यावर असून गुरुवारी रात्री एक वाजता या महिलांनी त्यांची भेट घेऊन ही मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे २८ जानेवारीपासून विदर्भ व खान्देश राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यावर असताना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील अनेक महिलांनी भेट घेत गार्‍हाणी मांडली. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिक्युरिटीच्या गराड्यातून आपला ताफा थांबवत जमलेल्या महिलांची भेट घेतली. यावेळी महिलांनी अधिकृत घरे करुन मिळावित अशी मागणी केली. यावेळी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत तुमच्या मागणीचा नक्कीच विचार करतो असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

याचबरोबर, इतक्या रात्री एक मंत्री आपल्याला भेटतात आणि आपल्या समस्या जाणून घेतात याबद्दल महिलांच्या चेहर्‍यावर समाधान पाहायला मिळाले. दरम्यान, शुक्रवारी मूल शहरातील अनेक महिलांची मागणीबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.

(स्वतंत्र निवडणुकीबाबत जयंत पाटील यांनी केलं मोठं विधान; 'राष्ट्रवादी परिवार संवाद'ची घोषणा)

Web Title: At one o'clock in the night, when many women meet the Water Resources Minister Jayant Patil on 'housing issues'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.