मला भाजपमधून फक्त 'त्या' एका नेत्याचा फोन आला; खडसेंनी सांगितलं नाव
By कुणाल गवाणकर | Published: October 22, 2020 12:36 PM2020-10-22T12:36:46+5:302020-10-22T12:38:41+5:30
eknath khadse: फडणवीसांवर टीका करत खडसेंचा भाजपला रामराम; उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
जळगाव: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंनी काल पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. खडसे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. त्याआधी आज पत्रकारांशी संवाद साधताना खडसेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधलं. माझा नेमका गुन्हा काय, पक्षातल्या इतर मंत्र्यांवरही आरोप झाले असताना केवळ माझाच राजीनामा का घेतला, मला वेगळी वागणूक का दिली गेली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले.
एकनाथ खडसे पुन्हा फडणवीसांवर बरसले; थेट मोदी-शहांची नावं घेऊन बोलले
माझ्यावर होत असलेल्या अन्यायाची व्यथा मांडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र कोणीही मला गांभीर्यानं घेतलं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 'दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. माझ्यावर झालेला अन्याय त्यांना सांगितला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटलो. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून गाऱ्हाणं मांडलं. तुम्ही देवेंद्र यांना घेऊन या. आपण चर्चेतून मार्ग काढू असं सांगण्यात आलं. हा निरोप मी देवेंद्रजींना दिला. त्यावर पुढील आठवड्यात जाऊ. पुढील महिन्यात जाऊ, असं म्हणत त्यांनी ४ वर्षे घालवली,' असं खडसे यांनी सांगितलं.
...अन् फडणवीसांनी ताफ्याची दिशाच बदलली; गाडी अचानक 'त्या' दिशेनं वळवली
खडसेंच्या राजीनाम्यानंतर राज्यातल्या भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. खडसेंनी पक्ष सोडायला नको होता, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यावरही खडसेंनी भाष्य केलं. 'माझ्याविरोधात करण्यात आलेल्या कट कारस्थानांचे पुरावे पक्षाला दिले. मात्र तरीही कारवाई झाली नाही. त्यामुळे पक्षाला आता माझी गरज राहिलेली नाही, हे माझ्या लक्षात आलं. मी नाराज असताना, सहा महिन्यांपासून पक्षांतरांची चर्चा असतानाही कोणीही संपर्क साधला नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला फोन केला. चर्चा करून मार्ग काढू म्हणाले. पण अखेरपर्यंत मार्ग निघालाच नाही,' असं खडसे म्हणाले.
भाजप सोडणाऱ्यांची यादी मोठी; पण काहींनाच झाला फायदा
भाजप-शिवसेनेचं सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र केवळ मलाच राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. इतरांना मात्र क्लीन चीट देण्यात आल्या. इतरांना आणि मला वेगळा न्याय का, असा सवाल खडसेंनी विचारला. फौजदारी गुन्हे असलेल्या, इतर पक्षांमधून आलेल्यांना पाठिशी घालण्यात आलं. पण पक्षासाठी ४० वर्षे राबणाऱ्या नेत्यावर सातत्यानं अन्याय करण्यात आला, अशा शब्दांत खडसेंनी फडणवीस यांना लक्ष्य केलं.
एकनाथ खडसेंनी हातात ‘घड्याळ’ बांधलं आता पंकजा मुंडेंनी 'शिवबंधन' बांधावं, शिवसेनेची ऑफर
देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्त्व फारच सक्षम आहे. त्यांच्यामुळेच आम्ही राज्यातील सत्ता गमावली, असा उपरोधिक टोलाही खडसेंनी लगावला. २०१४ मध्ये आमच्याकडे पैसा, साधनं नव्हती. तरीही आम्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोबत नसतानाही १२३ जागा जिंकलो. पण २०१९ मध्ये केंद्रात, राज्यात सत्ता असताना, शिवसेनेसोबत युती असतानाही १०५ जागांवर आलो. देवेंद्रजी मी पुन्हा येईन म्हणत होते. लोकांना हा अहंकार आवडला नाही. त्याऐवजी आम्ही पुन्हा येऊ म्हणायला हवं होतं, असं खडसे म्हणाले.