तिकीट न मिळाल्यास भाजपामध्ये या, चंद्रकांत पाटलांची प्रतीक पाटलांना खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 05:43 PM2019-03-28T17:43:45+5:302019-03-28T17:44:31+5:30

राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी प्रतीक पाटलांना खुली ऑफर दिली आहे.

open offer of Chandrakant Patil's to pratik patil | तिकीट न मिळाल्यास भाजपामध्ये या, चंद्रकांत पाटलांची प्रतीक पाटलांना खुली ऑफर

तिकीट न मिळाल्यास भाजपामध्ये या, चंद्रकांत पाटलांची प्रतीक पाटलांना खुली ऑफर

googlenewsNext

मुंबई- राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांनी प्रतीक पाटलांना खुली ऑफर दिली आहे. काँग्रेसनं तुम्हाला तिकीट न दिल्यास भाजपामध्ये या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेच वसंतदादा पाटील घराण्याची वाट लावली, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी आघाडीच्या नेत्यांवर केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच वसंतदादा पाटील यांचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यामुळे काँग्रेसला साताऱ्यानंतर शेजारच्या सांगलीमध्येही मोठा धक्का बसला. काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले असून यापुढे वसंतदादा पाटील साखर कारखान्याद्वारे समाजकार्य करत राहणार असल्याचे त्यांनी वसंतदादा गटाच्या मेळाव्यात सांगितले होते.

कोणत्याही राजकारणात भाग घेणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. यापुढे फक्त समाजकारण करणार आहे. काँग्रेसला वसंतदादा घराणे नको आहे. म्हणून मी काँग्रेसचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं होतं. यापुढे काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही तर आमचे बंधू विशाल पाटील यांनी अपक्ष लढावे, असे त्यांनी सांगितले. तर विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक. नाहीतर अपक्ष लढणार, असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. 
 

Web Title: open offer of Chandrakant Patil's to pratik patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.