SurJyotsna Awards 2021:'लिहून घ्या! केंद्र सरकार फ्री झालं की महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस'; भाजपा नेत्याने सांगितली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 08:52 PM2021-02-16T20:52:51+5:302021-02-16T20:59:50+5:30

Operation lotus in Maharashtra soon: राज्य सरकारची कामगिरी समाधान कारक नाही हे सगळ्यांच दिसतंय. लोकांनाही भाजपचंच सरकार हवंय. मुंबई महापालिकेत भाजप १२१ जागा जिंकणार, असे आमदार राज पुरोहित यांनी दावा केला आहे.

Operation Lotus in Maharashtra after Central Government becomes free: Raj Purohit | SurJyotsna Awards 2021:'लिहून घ्या! केंद्र सरकार फ्री झालं की महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस'; भाजपा नेत्याने सांगितली वेळ

SurJyotsna Awards 2021:'लिहून घ्या! केंद्र सरकार फ्री झालं की महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस'; भाजपा नेत्याने सांगितली वेळ

Next

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले तेव्हापासून भाजपाचे नेते काही दिवसांतच, लवकरच सरकार कोसळणार असल्याचे सांगत आले आहेत. तर आघाडीचे नेते पुढची 25 वर्षे भाजपाचे सरकार येत नाही असे टोले हाणत आले आहेत. नुकतीच राज्यातील सरकार कोसळणार अशी चर्चा सुरु झाली होती. त्यावर भाजपाच्या आमदाराने लेखी लिहून देतो, असे जाहीर आव्हान दिले आहे. (Raj purohit talk on Operation lotus in Maharashtra)


भाजपाचे आमदार राज पुरोहित यानी हे वक्तव्य केले आहे. लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. केंद्र सरकार फ्री झालं की महाराष्ट्रातील सरकार जाणार हे लिहून घ्या, असे सांगतानाच केंद्र सरकार फ्री झाले की काय याचा अर्थही त्यांनी सांगितला. केंद्र सरकार फ्री झालं म्हणजे नेमकं काय? असं विचारलं असता शेतकरी आंदोलन, बंगाल निवडणूक यातून फ्री झालं की राज्यात ऑपरेशन लोटस सुरु होणार असल्याचे ते म्हणाले. 

SurJyotsna Awards 2021: राज्यात काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार का?; अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं...


राज्य सरकारची कामगिरी समाधान कारक नाही हे सगळ्यांच दिसतंय. लोकांनाही भाजपचंच सरकार हवंय. मुंबई महापालिकेत भाजप १२१ जागा जिंकणार आणि भाजपचा झेंडा फडकणार आहे. शिवसेना फक्त सांगते. पण त्यांच्यात हिंदुत्व वगैरे काही उरलेलं नाही. आता फक्त कमळ कमळ आणि फक्त कमळ, असे ते म्हणाले. 


संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतोय. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे; तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात.


आशिष शेलार काय म्हणाले?
आघाडीचं स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातात आहे पण त्यांचे मंत्री अडथळे आणतायत का? असं विचारलं असता शेलार यांनी यामुळे सरकारची दिशा चुकतेय असे म्हटले. त्यानंतर जाता जाता दिशा या शब्दाचा अर्थ तुम्ही तुमच्या पद्धतीनं घ्या, असं मिश्किलपणे म्हणाले. दिशा सालियान आत्महत्येवरून शेलारांनी उद्धव ठाकरे यांचे पूत्र आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर बाण सोडला आहे.  

Web Title: Operation Lotus in Maharashtra after Central Government becomes free: Raj Purohit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.