opinion poll bihar 2020 :बिहारमध्ये पुन्हा नितीश सरकार, पण महाआघाडीच्याही जागा वाढणार

By बाळकृष्ण परब | Published: October 20, 2020 09:04 PM2020-10-20T21:04:03+5:302020-10-20T21:04:03+5:30

Bihar Assembly Election 2020 : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे पुनरागमन होण्याचे संकेत ओपिनयन पोलमधून दिसत आहेत.

opinion poll bihar 2020: NDA win election again in Bihar, but the seats of the Mahagathbandhan will also increase | opinion poll bihar 2020 :बिहारमध्ये पुन्हा नितीश सरकार, पण महाआघाडीच्याही जागा वाढणार

opinion poll bihar 2020 :बिहारमध्ये पुन्हा नितीश सरकार, पण महाआघाडीच्याही जागा वाढणार

Next
ठळक मुद्देनितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला १३३ ते १४३ जागा मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली/पाटणा - बिहारमधील विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे पुनरागमन होण्याचे संकेत ओपिनयन पोलमधून दिसत आहेत. लोकनीती-सीएसडीएसने प्रसिद्ध केलेल्या ओपिनियन पोलनुसार या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला १३३ ते १४३ जागा मिळणार आहेत. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला ८८ ते ९८ जागा मिळतील. तर स्वतंत्रपणे लढत असलेल्या एलजेपीला २ ते ६ आणि इतर पक्षांना ६ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे.

या सर्वेनुसार यंदाच्या निवडणुकीत एनडीएला ३८ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला ३२ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. या मतांचे जागांमध्ये परिवर्तन केल्यास एनडीएला १३३ ते १४३, महा आघाडीला ८८ ते ९८, लोकजनशक्ती पार्टीला २ ते ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना ६ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे.

तसेच या ओपिनियन पोलमधील आकडेवारीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली असून, तेजस्वी यादव यांच्या लोकप्रितेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील पुढील मुख्यमंत्रिपदासाठी नीतीश कुमार यांना ३१ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. तर राजद नेते तेजस्वी यादव यांना २७ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. एनडीएपासून वेगळे होत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणाऱ्या चिराग पासवान यांना ५ टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शवला. तर भाजपाचे नेते सुशील कुमार मोदी यांना चार टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. सर्वेमध्ये ३ टक्के मतदारांनी लालूप्रसाद यादव यांना ३ टक्के मतदारांनी समर्थन दिले.

दरम्यान, नितीश कुमार यांच्या कारभारावर समाधानी असलेल्या मतदारांच्या संख्येमध्येही मोठी घट सर्वेमध्ये दिसून आली आहे. सर्वेत सहभागी झालेल्या राज्यातील ५२ टक्के मतदारांनी नितीश कुमार यांच्या कारभारावर समाधान दर्शवले. तर ४४ टक्के मतदारांनी नितीश कुमार यांच्या कारभाराबाबत असमाधान व्यक्त केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर ६१ टक्के मतदारांनी समाधान आणि ३५ टक्के मतदारांनी असमाधान व्यक्त केले.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.

Web Title: opinion poll bihar 2020: NDA win election again in Bihar, but the seats of the Mahagathbandhan will also increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.