“आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही”; निलेश राणेंनी अभिनेत्री कंगना राणौतला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 12:29 PM2020-09-03T12:29:33+5:302020-09-03T12:31:27+5:30

2/3 अधिकारी प्रेशरमध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही.

"Our police will not tolerate insults"; Nilesh Rane narrated to actress Kangana Ranaut | “आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही”; निलेश राणेंनी अभिनेत्री कंगना राणौतला सुनावलं

“आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही”; निलेश राणेंनी अभिनेत्री कंगना राणौतला सुनावलं

Next
ठळक मुद्देमुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणौत कोण लागून गेली?आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाहीमाजी खासदार निलेश राणेंनी अभिनेत्री कंगना राणौतला फटकारलं

मुंबई – बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची भीती वाटते असं अभिनेत्री कंगना रणौतनं म्हटलं होतं. यावरुन आता माजी खासदार निलेश राणे यांनी तिला कडक शब्दात सुनावलं आहे. आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

याबाबत निलेश राणेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, 2/3 अधिकारी प्रेशरमध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणौत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाली होती कंगना राणौत?   

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर उघडपणे बोलणारी अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणारे वक्तव्य केले होते. भाजपाचे आमदार राम कदम यांनी एक ट्विट केले होते. त्यावर कंगनाने उत्तर देत बॉलीवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे म्हटलं होतं. यावरून कंगनाला ट्रोलचा सामनाही करावा लागला होता.

कंगना राणौत गेल्या १०० तासांहून अधिक काळापासून ड्रग माफियांची पोलखोल करण्यास तयार आहे. मात्र, तिला पोलीस सुरक्षेची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकार ते पुरवत नसल्याचे ट्विट राम कदम यांनी केलं होतं. यावर कंगनाने मुव्ही माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत आहे. मुंबईमध्ये मला हिमाचल प्रदेश सरकार किंवा केंद्र सरकारची सुरक्षा हवी, मुंबई पोलिसांची नको, असे उत्तर दिले आहे. महत्वाचे म्हणजे राम कदम यांनी याचं समर्थनही केलं होतं.

अमृता फडणवीस यांनीही केली होती टीका

अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं जात आहे, त्यावरून मुंबईने माणुसकीच गमावलीय असं वाटतं असल्याचं म्हटलं होतं. "सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा ज्या तऱ्हेने तपास सुरू आहे, त्यावरून मुंबईने माणुसकी गमावलीय असं मला वाटत आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही" असं अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन म्हटलं होतं.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर सुरु असणाऱ्या चौकशीत ड्रग्स कनेक्शनही उघड झालं होतं. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स यांचा संबंध पुन्हा ऐरणीवर आला. बॉलिवूड स्टार कंगना राणौतनं ड्रग्सबाबत उघडपणे बोलताना थेट बॉलिवूडच्या ४ स्टार्सची नावे घेतली होती. यात रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांची ब्लड टेस्ट करावी असं म्हटलं होतं. यावरुन निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. केवळ रणवीर अथवा रणबीर कशाला तर आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची चाचणी करावी, कारण बॉलिवूडच्या सर्कलमध्ये आदित्य ठाकरेंचा वावर असतो असं निलेश राणे म्हणाले आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

"फक्त रणबीर अन् रणवीर कशाला, आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची टेस्ट करा"

अ‍ॅम्ब्युलन्सची वाट बघतच अनेकांनी जीव गमावला; आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

 

"सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये"

हुकूमशहा किम जोंग उननं व्हाईट हाऊसच्या सेक्रेटरीला डोळा मारला, त्यावर डोनाल्ड टम्प म्हणाले...

iPhone साठी चाहत्याने २० वेळा केलं अभिनेत्याला ट्विट; सोनू सूदनंही दिला मजेशीर रिप्लाय


 

Read in English

Web Title: "Our police will not tolerate insults"; Nilesh Rane narrated to actress Kangana Ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.