Oxygens: “केंद्र सरकारच्या खोट्या आत्मविश्वासामुळं देशावर ऑक्सिजन संकट; आरोग्यमंत्र्यांना काढून टाका”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 03:26 PM2021-04-28T15:26:58+5:302021-04-28T15:29:59+5:30

कोरोनाचा संभावित धोका लक्षात घेता सरकारने १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले होते.

Oxygen crisis in the country due to false confidence of the central government Prithviraj Chavan | Oxygens: “केंद्र सरकारच्या खोट्या आत्मविश्वासामुळं देशावर ऑक्सिजन संकट; आरोग्यमंत्र्यांना काढून टाका”

Oxygens: “केंद्र सरकारच्या खोट्या आत्मविश्वासामुळं देशावर ऑक्सिजन संकट; आरोग्यमंत्र्यांना काढून टाका”

Next
ठळक मुद्देरुग्णालय आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रत्येक मिनिटाला ऑक्सिजनसाठी फोन येत आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिला जात आहे.देशात ऑक्सिजन नसल्याने अनेक ठिकाणी रुग्ण दगावल्याच्या बातम्या येत आहेत. १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याच्या प्रक्रियेचं काय झालं? मागील ५ महिन्यात किती ऑक्सिजन आयात झाला?

मुंबई – देशात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे त्याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. दिल्लीत ५ महिन्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य सचिवांनी मेडिकलच्या गरजेसाठी ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत चांगली स्थिती आहे असा दावा केला होता. मागील १० महिन्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासला नाही आणि यापुढेही कमी पडणार नाही असं सांगितले होतं असा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केला आहे.(Congress Prithviraj Chavan Target Central government over Oxygens shortage in India) 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोनाचा संभावित धोका लक्षात घेता सरकारने १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले होते. सरकार ऑक्सिजनची पूर्तता करण्यास अयशस्वी ठरलं आहे. त्यामुळे देशावर अभूतपूर्व ऑक्सिजन संकट उभं राहिलं आहे. रुग्णालय आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रत्येक मिनिटाला ऑक्सिजनसाठी फोन येत आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिला जात आहे. देशात ऑक्सिजन नसल्याने अनेक ठिकाणी रुग्ण दगावल्याच्या बातम्या येत आहेत. दिल्लीच्या खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी हायकोर्टाचे दरवाजे ठोठवावे लागले. हे त्रासदायक चित्र आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच ही सगळी परिस्थिती पाहता केंद्र सरकारला काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. ऑक्सिजन पुरवठाबाबत आरोग्य मंत्रालयाने कशाच्या आधारे देशात चांगली स्थिती आहे असा दावा केला होता? १ लाख टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याच्या प्रक्रियेचं काय झालं? मागील ५ महिन्यात किती ऑक्सिजन आयात झाला? ही प्रक्रिया कोणी थांबवली? सध्याच्या स्थितीत १६२ पीएसए ऑक्सिजन उत्पादन यंत्रणेपैकी देशात केवळ ३३ हॉस्पिटलमध्ये हे यंत्र लावण्यात आले आहे हे खरं आहे का? असे प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केलेत.

दरम्यान, जागतिक आर्थिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची पाठ ठोपटून घेतली होती. कशारितीने भारताने कोरोनाला हरवलं? परंतु आज ५० पेक्षा अधिक देशांनी विमान वाहतूक थांबवली असून त्यांच्याकडे आपण मदतीसाठी याचना करत आहोत. देशाच्या अशा नेतृत्वामुळे मोठी किंमत मोजावी लागत आहे. निर्णय क्षमतेचा अभाव असल्यानं भारत या संकटात उभा आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव गेलेल्यांचे नातेवाईकांना उत्तर हवं. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या आरोग्य मंत्री आणि अन्य अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Web Title: Oxygen crisis in the country due to false confidence of the central government Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.