शिवसेनेनं पालघरमध्ये वनगांना डावललं, राजेंद्र गावितांना धनुष्यबाणाची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 04:59 PM2019-03-25T16:59:52+5:302019-03-25T17:04:29+5:30

पालघर लोकसभा निवडणुकीचा सेना-भाजपाचा तिढा जवळपास सुटल्याचे निश्चित मानले जात आहे.

Palghar Lok Sabha Constituency shivsena Candidature rajendra gavit | शिवसेनेनं पालघरमध्ये वनगांना डावललं, राजेंद्र गावितांना धनुष्यबाणाची उमेदवारी

शिवसेनेनं पालघरमध्ये वनगांना डावललं, राजेंद्र गावितांना धनुष्यबाणाची उमेदवारी

Next

वसई-विरार- पालघर लोकसभा निवडणुकीचा सेना-भाजपाचा तिढा जवळपास सुटल्याचे निश्चित मानले जात आहे. पालघर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं 25-23चा फॉर्म्युला तयार केला आहे. यावेळी भाजपानं पालघरची जागा शिवसेनेला सोडली आहे. चिंतामण वनगा यांचे गेल्या वर्षी जानेवारीत दिल्लीत निधन झाले होते. त्यानंतर त्या जागेसाठी त्यांचे पुत्र इच्छुक होते.

परंतु भाजपानं त्यांना डावलून राजेंद्र गावितांना उमेदवारी दिल्यानं श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी पोटनिवडणूक लढवली होती. परंतु ते पराभूत झाले. मात्र त्यांनी भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना चांगली टक्कर देत जवळपास अडीच लाख मतं मिळवली. त्यामुळे ही जागा शिवसेनेसाठी यंदा सोडण्यात आली. पण शिवसेनेकडून पालघरमध्ये यंदा पुन्हा भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित उमेदवारी मिळणार असून, ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत 26-22 असा फॉर्म्युला होता. त्यावेळी भाजपानं स्वत:च्या कोट्यातील दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी हातकणंगलेमधून निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले होते. तर महादेव जानकर बारामतीमधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. ते राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंकडून पराभूत झाले होते. मात्र त्यांनी सुळे यांनी कडवी लढत दिली होती. दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडणाऱ्या भाजपानं 2014 मध्ये 24 जागा लढवल्या. त्यातील 23 जागा त्यांनी जिंकल्या. तर शिवसेनेनं 22 जागा लढवत 18 जागांवर यश मिळवलं होतं.

Web Title: Palghar Lok Sabha Constituency shivsena Candidature rajendra gavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.