UP panchayat Election: गोरखपूरचा गड कसा राखायचा? योगी आदित्यनाथांसमोर मोठा पेच, अपक्षांच्या जागा जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 03:16 PM2021-05-04T15:16:05+5:302021-05-04T15:17:30+5:30

UP Panchayat Election Results 2021: गोरखपूरमध्ये जिल्हा पंचायतीच्या एकूण ६८ जागा आहेत. यापैकी भाजपा आणि सपा-बसपाला समान जागा मिळाल्या आहेत.

UP Panchayat Election Results 2021: Yogi Adityanath in a big trouble of Gorakhpur; independent became kingmaker | UP panchayat Election: गोरखपूरचा गड कसा राखायचा? योगी आदित्यनाथांसमोर मोठा पेच, अपक्षांच्या जागा जास्त

UP panchayat Election: गोरखपूरचा गड कसा राखायचा? योगी आदित्यनाथांसमोर मोठा पेच, अपक्षांच्या जागा जास्त

Next

UP Gram Panchayat Election 2021  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे पेचात सापडले आहेत. त्यांचा गड असलेल्या गोरखपूरमध्ये  जिल्हा पंचायत निवडणुकीत (Gorakhpur panchayat Election) भाजपपेक्षा (BJP) अपक्षांनाच जास्त जागा मिळाल्या आहेत. तर भाजपा एवढ्याच जागा या सपा-बसपाला मिळल्याने गोरखपूर ताब्यात ठेवण्यासाठी आदित्यनाथांना मोठी कसरत करावी लागणार आहे. (Independent candidates won more than bjp, Samajvadi party and BSP in CM Yogi Adityanath's Gorakhpur.)


गोरखपूरमध्ये जिल्हा पंचायतीच्या एकूण ६८ जागा आहेत. यापैकी भाजपा आणि सपा-बसपाला समान जागा मिळाल्या आहेत. भाजपाला २० जागा तर सपाला १९ जागा मिळाल्या आहेत. याशिवाय काँग्रेस, आप, निषाद यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. लक्षनिय म्हणजे २४ जागांवर अपक्षांनी विजय मिळविला आहे. अपक्षांच्या जास्त जागा आल्याने सत्ता कोण स्थापन करण्यात यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

UP panchayat Election: अयोध्या, काशी, मथुरा! भाजपाचा दारूण पराभव; पंचायत निवडणुकीत सपा, बसपाने चारली धूळ
 

मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथांना काहीही करून सत्ता स्थापन करावीच लागणार आहे. मात्र, २०१५ मध्ये मागासवर्गीयांसाठी अध्यक्षपद राखीव होते. मात्र, भाजपाने या समाजाचा उमेदवारच न दिल्याने ती जागा अखिलेश यादवांच्या जवळच्या नेत्याच्या पत्नीला मिळाली होती. तेव्हा सपाच्याच दोन नेत्यांमध्ये अध्यक्षपदासाठी टक्कर झाली होती. अन्य पक्षांनी गीतांजलि यादव यांना पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय झाला होता. 

UP panchayat Election: दोन वेळा खासदार, साधी जिल्हा पंचायत निवडणूक जिंकता आली नाही; 2100 मतांनी पराभव

लखनऊच्या मोहनलालगंज मतदारसंघातून दोनवेळा खासदार राहिलेल्या भाजपाच्या उमेदवार रीना चौधरी (Ex MP reena chaudhary) यांना साधी जिल्हा पंचायत निवडणूक जिंकता न आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने पाडले आहे. लखनऊच्या जिल्हा पंचायतचे अध्यक्षपद हे एससी महिलेसाठी राखीव होते. यामुळे भाजपाने माजी खासदार असलेल्या रीना चौधरी यांना वॉर्ड नंबर १५ मधून जिल्हा पंचायतीची उमेदवारी दिली. आता दोन वेळा खासदार असलेली महिला जिल्हा पंचायतला निवडून येणार नाही असे कुठे होईल का? भाजपाने त्यात त्यांना जिल्हा पंचायतचा अध्यक्ष बनविणार असल्याचा डाव खेळला. पण हा खेळ भाजपाच्याच अंगलट आला. सपा समर्थित पलक रावतने चौधरी यांना 2100 मतांनी पराभूत केले. 

उत्तर प्रदेशच्य़ा या मिनी विधानसभा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या निवडणुकीत पूर्वांचल, अवध आणि मध्ये युपीमध्ये सपाचा दबदबा पहायला मिळाला आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा क्षेत्र असलेल्या वारणसी आणि अयोध्येमध्ये भाजपाला कडवी हार पत्करावी लागली आहे. तर पश्चिम युपीमध्ये भाजपाला विजयासाठी झगडावे लागले आहे. तिथे जाटबहुल भागात अजीत सिंहांच्या आरएलडीने भाजपावर मात केली आहे. 


पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेशच्या पंचायत निवडणुकांनी भाजपाची (BJP Defeat) झोप उडविली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला मोठा झटका बसला आहे. अयोध्येपासून मथुरेपर्यंत आणि काशीसह राज्यभरात सपाने भाजपाला चितपट केले आहे. महत्वाचे म्हणजे हे तिन्ही जिल्हे योगी आदित्यनाथ सरकारच्या (Yogi Adityanath) अजेंड्यामध्ये नेहमी असतात. या तीन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून योगी सरकारने खूप मेहरबानीदेखील केली आहे. यामुळे या तिन्ही जिल्ह्यांत झालेली पडझड भाजपाला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठे संकेत देत आहे. 

Web Title: UP Panchayat Election Results 2021: Yogi Adityanath in a big trouble of Gorakhpur; independent became kingmaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.