Pandharpur Assembly By Election: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा पदाधिकाऱ्याचा बंडाचा झेंडा; महाविकास आघाडीत ठिणगी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 04:49 PM2021-03-26T16:49:06+5:302021-03-26T16:50:19+5:30

Pandharpur Assembly By Election shiv sena leader files nomination: पंढरपुरात शिवसेनेची बंडखोरी; महिला जिल्हा प्रमुख निवडणुकीच्या रिंगणात 

Pandharpur Assembly By Election shiv sena leader files nomination likely to create problem for ncp | Pandharpur Assembly By Election: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा पदाधिकाऱ्याचा बंडाचा झेंडा; महाविकास आघाडीत ठिणगी?

Pandharpur Assembly By Election: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा पदाधिकाऱ्याचा बंडाचा झेंडा; महाविकास आघाडीत ठिणगी?

Next

सोलापूर: राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट लढत अपेक्षित होती. मात्र इथे महाविकास आघाडीमध्येच फूट पडल्याचं दिसत आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शैला गोडसेंनी केलेल्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. (Pandharpur Assembly By Election shiv sena leader files nomination)

आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर या सरकारला जाग येणार: देवेंद्र फडणवीस 

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत अपेक्षित होती. पण महाविकास आघाडीतला घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बंडखोरी केली. त्यापाठोपाठ आता शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनीसुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा कॉंग्रेस पक्षाचीच : नितीन नागणे

राष्ट्रवादीकडून कोणाला तिकीट?
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात धनगर समाजाच्या मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे यांना तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी शिंदेंचा पराभव केला होता.

भाजपप्रमाणेच राष्ट्रवादीनेदेखी अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके किंवा मुलगा भगिरथ भालके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. उमेदवार निवडीसाठी काही दिवसांपूर्वीच पंढरपूरमध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक बैठक घेतली. यानंतर दिल्लीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत पार्थ यांच्या नावाची चर्चा झाल्याचं समजतं.

Web Title: Pandharpur Assembly By Election shiv sena leader files nomination likely to create problem for ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.