Pandharpur Election Results Live : "ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय? भाजपाने पंढरपूरमध्ये तुम्हाला घरात शिरून ठोकलंय"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 05:32 PM2021-05-02T17:32:58+5:302021-05-02T18:07:28+5:30
Pandharpur Election Results Llive : महाराष्ट्रात झालेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी पराभव केला आहेत.
मुंबई - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करत ममता बॅनर्जीं यांनी मैदान मारले आहे. मात्र इकडे महाराष्ट्रात झालेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी पराभव केला आहेत. (Pandharpur Election Results ) दरम्यान, या विजयानंतर भाजपाचे नेते आणि माजी आमदार निलेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर बोचरी टीका केली आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, त्या अजित पवारांना शोधा. ते नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून भाजपाने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय?? बंगालमध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रासुद्धा नाही. संजय राऊत तुम्ही स्वतः कधी निवडून येणार ते सांगा? असा सवालही निलेश राणे यांनी केला.
त्या अजित पवारांना शोधा.. नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून बीजेपी ने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय?? बंगाल मध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग?
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 2, 2021
बंगाल्या निकालांसंदर्भातही निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे, त्यात ते म्हणातात की, ममता बॅनर्जी जिंकल्या खऱ्या पण कशा जिंकल्या हे विसरून चालणार नाही. कृष्णकथा आणि चंडीपाठ व्यासपिठावर त्यांना म्हणावं लागलं. ममतादीदींना हिंदूंचा आसरा घ्यावाच लागला. लेफ्ट वाल्यांशी किंवा काँग्रेसशी लढताना त्यांना कधीही हिंदू आठवला नव्हता तो पहिल्यांदा आठवला. हे काय कमी आहे, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी जिंकल्या खऱ्या पण कशा जिंकल्या हे विसरून चालणार नाही. कृष्णकथा आणि चंडीपाठ व्यासपिठावर त्यांना म्हणावं लागलं. ममतादीदींना हिंदूंचा आसरा घ्यावाच लागला. लेफ्ट वाल्यांशी किंवा काँग्रेसशी लढताना त्यांना कधीही हिंदू आठवला नव्हता तो पहिल्यांदा आठवला... हे काय कमी आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 2, 2021
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीने भरत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपाने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली होती. अखेर अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपाच्या समाधान अवताडे यांनी भगिरथ भालकेंचा ३ हजार ७१६ मतांनी पराभव केला.