पंडित नेहरुंच्या स्मृतीदिनानिमित्त अटलबिहारी वाजपेयींचा व्हिडिओ शेअर करत जयंत पाटलांचा भाजपाला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 01:23 PM2021-05-27T13:23:24+5:302021-05-27T13:33:33+5:30

Pandit Jawaharlal Nehru Death Anniversary : पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कायमच या देशामध्ये सन्मान होत राहिला आहे. तसेच यापुढेही होत राहील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंडित नेहरुंना अभिवादन केले आहे.

Pandit Jawaharlal Nehru Death Anniversary Minister Jayant Patil Share Atal Bihari Vajpayee Speech Video | पंडित नेहरुंच्या स्मृतीदिनानिमित्त अटलबिहारी वाजपेयींचा व्हिडिओ शेअर करत जयंत पाटलांचा भाजपाला चिमटा

पंडित नेहरुंच्या स्मृतीदिनानिमित्त अटलबिहारी वाजपेयींचा व्हिडिओ शेअर करत जयंत पाटलांचा भाजपाला चिमटा

googlenewsNext
ठळक मुद्देजयंत पाटील यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका भाषणाची आठवण करुन देत भाजपाला चिमटा काढला आहे. '१९९९ सालीच्या अविश्वास ठरावाच्या वेळी देखील पंडित नेहरू यांचा गौरव पूर्ण उल्लेख अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणात केला होता.'

मुंबई : गेल्या काही वर्षांत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बदनामीची एक शिस्तबद्ध मोहीम या देशात एका विशिष्ट वर्गाकडून चालवली जात आहे. मात्र या वर्गाकडून पंडित नेहरूंची उंची कितीही कमी करायचा प्रयत्न केला, तरीही ती कमी होणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कायमच या देशामध्ये सन्मान होत राहिला आहे. तसेच यापुढेही होत राहील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंडित नेहरुंना अभिवादन केले आहे. (Pandit Jawaharlal Nehru Death Anniversary Minister Jayant Patil Share Atal Bihari Vajpayee Speech Video)

याचबरोबर, जयंत पाटील यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका भाषणाची आठवण करुन देत भाजपाला चिमटा काढला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे या देशाच्या संसदेचे सदस्य होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी भाषणात म्हटले होते की, "भय व भूकमुक्त जगाचे एक स्वप्न उध्वस्त झाले असून, भारतमाता आज शोकाने भरून गेली आहे, भारतमातेने तिचा आवडता राजकुमार आज गमावला आहे.जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा संरक्षक आता आपल्यात नाही. सूर्यास्त झाला असून आपल्याला आपला रस्ता शोधायला हवा. जरी आमच्यामध्ये मतभेद असले तरीही आम्हाला पंडितजींची आदर्श मूल्ये, देशाप्रतीचे प्रेम आणि असीम धैर्याबद्दल केवळ आदरच आहे". 

दरम्यान, १९९९ सालीच्या अविश्वास ठरावाच्या वेळी देखील पंडित नेहरू यांचा गौरव पूर्ण उल्लेख अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणात केला होता. ते भाषण सोबत व्हिडिओ स्वरूपात आहे. यातूनच पंडित नेहरूंची महानता लक्षात येते. पंडित नेहरू यांनी कायमच आपल्या विरोधी विचारांचा आदर केला तसेच लोकशाही मूल्यांना कधीही तडा जाऊ न देता संसदेला सर्वोच्च मानले. स्वतंत्र भारताची पायाभरणी पंडित नेहरू यांनीच केली. ते एक व्यक्ती म्हणून, स्वातंत्र्यसैनिक म्हणून तर महान होतेच पण या देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून या देशाच्या उभारणीत सर्वोच्च वाटा पंडित नेहरूंचा आहे, असे सांगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त जयंत पाटील यांनी अभिवादन केले.


(काँग्रेस आमदाराला अज्ञात महिलेकडून व्हिडिओ कॉल, अश्लील कृत्य करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न)

Web Title: Pandit Jawaharlal Nehru Death Anniversary Minister Jayant Patil Share Atal Bihari Vajpayee Speech Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.