'...तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 08:48 AM2021-08-17T08:48:22+5:302021-08-17T10:49:30+5:30

Pankaja Munde on reservation: बीडमध्ये आयोजित भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पंकजा मुंडे बोलत होत्या.

pankaja munde announces no felicitation until maratha and obc reservation issue solved | '...तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही'

'...तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही'

googlenewsNext

बीड: 'मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण(Maratha Reservation) मिळत नाही आणि ओबीसी समाजाचे(OBC Reservation) राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही', अशी घोषणा भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे. बीडमध्ये आयोजित भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत असताना पंकजा यांनी ही घोषणा केली.

या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'मी आता ही लढाई लढायचं ठरवलंय. बीड जिल्ह्यानं एक वेगळं उदाहरण घालून दिलं पाहिजे. ज्याला आज खुर्चीवर बसायचंय, त्याला हेच पाहिजे. आपसात भांडा आणि मरा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नाही केलं. सोशल इंजिनिअरिंग करणारा जगातील पहिला माणूस कोण असेल तर ते शिवाजी महाराज होते. मुंडे साहेबांना विचारलं तुमचं राजकीय गुरु कोण, तर ते म्हणायचे मी राजकारण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य कारभार डोळ्यासमोर ठेवतो,' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा पुढे म्हणाल्या की, 'माझे इतर पक्षांमध्येही चांगले संबंध आहेत. मला वाटतंच नाही की मुख्यमंत्री बदललेत. गोपीनाथ गडावर भागवत कराड आले म्हणून मला विचारलं, तेव्हा मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे येऊन गेले,  छगन भुजबळ मंत्री झाल्यावर आले होते, दोन्ही छत्रपती येऊन गेले अमित शहा येऊन गेले सगळं घेऊन गेले गोपीनाथ गड ही लोकनेते मुंडे साहेबांची समाधीस्थळ आहे,' असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

बीडमध्ये नंबर दोनचे धंदे वाढले
भाषणादरम्यान पंकजा यांनी नाव न घेता धनंयज मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. 'जिल्हा नियोजन बैठकीत अभियंता का येत नाही ? तुम्ही विकले गेलेले अधिकारी आणता. माझ्या वेळी अवैध धंदे होत होते का? आता तर माझ्या मतदारसंघांमध्ये एवढे नंबर 2 चे धंदे झालेत, पाहिजे तेवढ्या हातभट्ट्या लावा पाहिजे तेवढी दारूचे दुकान टाका, मटके तर उघडून ठेवले, जुगार वाढला आहे, जिल्ह्यामध्ये कशाला लोक पोलिसांना घाबरतील. प्रतिमा आणि प्रतिष्ठा मिळविण्याची लायकी कुणाकडे असते आणि कुणाकडे नसते, असं म्हणत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना टोला लगावला.
 

Web Title: pankaja munde announces no felicitation until maratha and obc reservation issue solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.