खडसेंनंतर पंकजांकडून शरद पवारांचे कौतुक; चर्चा तर होणारच

By हेमंत बावकर | Published: October 27, 2020 11:03 PM2020-10-27T23:03:46+5:302020-10-27T23:06:17+5:30

Pankaja Munde Tweet : आजचा दिवस राजकीय वैरी एकत्र येण्याचा ठरला. पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली.

Pankaja munde appreciate Sharad Pawar after Khadse; political Discussion start | खडसेंनंतर पंकजांकडून शरद पवारांचे कौतुक; चर्चा तर होणारच

खडसेंनंतर पंकजांकडून शरद पवारांचे कौतुक; चर्चा तर होणारच

googlenewsNext

मुंबई : भाजपातील नेतृत्वावर नाराज असलेल्या नेत्यांपैकी एक एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचे वादळ शमत नाही तोच पंकजा मुंडे यांनी आज शरद पवारांची स्तुती केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


झाले असे की, आजचा दिवस राजकीय वैरी एकत्र येण्याचा ठरला. पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे शेजारी शेजारी बसले होते. त्यांच्यात चर्चाही सुरु होती. या बैठकीत कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला असून कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. साखर कारखान्यांशी दरवाढीसंदर्भातील तीन वर्षांचा करार करण्यात येईल. तसेच मुकादमांचे कमिशन १९ टक्के करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ऊसतोड कामगार संघटनांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून कामगार आता कारखान्यांवर रूजू होतील. 


दरम्यान या बैठकीनंतर पंकजा यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी शरद पवारांना हॅट्स ऑफ म्हणत कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले ... पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे, असे ट्विट केले आणि चर्चांना उधान आले. 


दसरा मेळाव्यात देखील पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचाही उल्लेख केला. कारण धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आहेत. शरद पवारांशी आपले कसे जवळचे संबंध आहेत. फोन केल्यावर ते कसे प्रश्न सोडवाला मदत करतात, हे त्यांनी यानिमित्ताने सांगितले. 



आजच्या बैठकीत या बैठकीदरम्यान स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाद्वारे ऊसतोड कामगारांच्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करण्यात आले. महामंडळ नोंदणी लवकर पूर्ण करून डिसेंबरपासून महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत निर्देश देण्यात आले.
ऊसतोड कामगारांची नोंदणी, साखर कारखाने तसेच ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना, वैयक्तिक अर्थसहाय्य योजना, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे, भोजन योजना, कामगार महिलांसाठी आरोग्य योजना, कामगारांसाठी विमा योजना, यांसह विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

Web Title: Pankaja munde appreciate Sharad Pawar after Khadse; political Discussion start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.