पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,समजुत काढणार की वेगळा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 12:10 PM2021-07-11T12:10:24+5:302021-07-11T13:56:02+5:30

Pankaja Munde call important meeting in Mumbai: पंकजा मुंडे यांनी मंगळवारी मुंबईत पक्षाच्या नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे

Pankaja Munde called an emergency meeting of supporters in mumbai | पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,समजुत काढणार की वेगळा निर्णय घेणार?

पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,समजुत काढणार की वेगळा निर्णय घेणार?

Next
ठळक मुद्देआतापर्यंत बीड जिल्ह्यातील 49 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती

मुंबई: काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार(Cabinet Expansion) झाला. त्यात महाराष्ट्रातून चार नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागली. विशेष म्हणजे, भाजप नेत्या प्रीतम मुंडे(Pritam Munde) यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना त्यांना डावलून राज्यसभा खासदार भागवत कराड(Bhagwat Karad) यांना मंत्रिपद देण्यात आले. यामुळे मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या नाराजीमुळे अनेक पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी मंगळवारी म्हणजेच 13 जुलै रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी ही माहिती दिली. 

मस्के यांनी सांगितल्यानुसार, पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्या वरळी येथील कार्यालयात या नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत पंकजा मुंडे आपल्या पदाधिकाऱ्यांना काय सांगणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान, आतापर्यंत बीड जिल्ह्यातील 49 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहेत. विशेष म्हणजे, यात बीडमधील सर्वच 11 तालुकाध्यक्षांचाही समावेश आहे. त्यांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सोपवले आहेत.

पंकजा मुंडे दिल्लीला रवाना


या सर्व नाराजी नाट्यादरम्यान पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना झाल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nadda) यांच्याशी त्या चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रीतम मुंडे या मंत्रिपदाच्या दावेदार आणि पात्र असतानाही त्यांना डावलण्यात आल्याबद्दल त्या नाराजी बोलून दाखवणार असल्याचे सांगितले जात आहे.

'भाजप मला संपवत आहे असे मला वाटत नाही'

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाराज असल्याच्या वृत्तांवर स्पष्टीकरण दिले होते.  भारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडेंसह हिना गावित आणि इतरांचीही नावे चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेत असते. प्रत्येक राज्याच्या बाबतीत असेच होते. प्रीतम मुंडे खूप कष्टाळू आहेत, केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या इतकंच मर्यादित नाही तर त्यांचे कामही चांगले आहे. सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले. पक्षाने घेतलेला निर्णय पटलेला आहे. भाजप मला संपवत आहे असे मला वाटत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

Web Title: Pankaja Munde called an emergency meeting of supporters in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.