Video: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...

By प्रविण मरगळे | Published: September 26, 2020 09:22 PM2020-09-26T21:22:47+5:302020-09-26T21:27:48+5:30

पक्षाने जी जबाबदारी दिली आहे त्यातून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी योगदान देईन असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. 

Pankaja Munde first reaction after being elected to the BJP's national executive | Video: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Video: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Next
ठळक मुद्देभाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत पंकजा मुंडे यांना सचिवपदाची जबाबदारी राष्ट्रीय कार्यकारणीत निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंद, मीदेखील आनंदी आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी विश्वास ठेवला, त्यांचे आभारी आहे

मुंबई – भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारणी आज जाहीर झाली, यात महाराष्ट्रातील २ दिग्गज नेत्यांसह अन्य ६ जणांना सामावून घेण्यात आलं आहे. विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडेभाजपाच्या सक्रीय कार्यक्रमापासून दूर होत्या. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केले होते, त्यामुळे आज राष्ट्रीय स्तरावर झालेल्या निवडीनंतर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया महत्त्वाची होती.

या निवडीनंतर पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला, त्या म्हणाल्या की, राष्ट्रीय कार्यकारणीत निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे, मलाही यात आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी विश्वास ठेवला, अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांच्या टीममध्ये सामावून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार मानते, पक्षाने जी जबाबदारी दिली आहे त्यातून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मी योगदान देईन असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. 

तसेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी गेली अनेक दशकं आपली हयात घातलेल्या लाखो कार्यकर्त्यांच्या स्वयंसेवकांच्या त्याग आणि समर्पणाला अभिवादन करुन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदाच्या जबाबदारीचा सहर्ष सविनय स्वीकार करते, हा मी माझा सन्मान समजते अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.

पंकजा मुंडेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप

भाजपमध्ये जाणीवपूर्वक पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न झाले, माझ्यासह पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित अशा बहुजन समाज व ओबीसी नेत्यांना दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे आम्ही ओबीसी समाजातील नेत्यांना उमेदवारी देतो असे दाखवायचे आणि दुसरीकडे जे नेते समाजावर पकड ठेवून आहेत त्यांचे पंख छाटले जात आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला होता.

 काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

विधान परिषदेत संधी न मिळाल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी भाष्य केले होते, ''मला काही वाईट वगैरे वाटलं नाही किंवा दुख: झालं नाही. राज्यातल्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की, तुमचं नाव असल्यामुळे तुमची तयारी असावी. पण जे झालं त्यांना मी शुभेच्छा दिल्या. माझे कार्यकर्ते नाराज झाले. पण मी त्यांना धीर दिला. मी राजकारणात कुठल्या सक्रिय पदावर नाही. त्यामुळे मी समाजकारणात आहे. एखादी एनजीओ चालवणारी व्यक्ती जितकी सक्रिय समाजकारणात असते. तितकी मी आहे.'' असे पंकजा यांनी म्हटलं होतं. कोरोना महामारीच्या संकटात महाराष्ट्र सरकारविरुद्ध भाजपाने केलेल्या आंदोलनात सहभागी न होण्याबाबत पंकजा यांना प्रश्न विचारला होता. त्यावर, मी सध्या समाजकारणात आहे, त्यामुळे मी आंदोलनात नव्हते असं उत्तर त्यांनी दिलं होतं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

चर्चा तर होणारच! युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...

भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात २ तास गुप्त बैठक

फडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण..."

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण?; कोणाला मिळालं कोणतं पद?... वाचा

“शिवसेनेनं नागरिकांना डॉक्टरचा सल्ला न घेता 'कंपाउंडर'कडून औषधे घेण्यास प्रोत्साहन देऊ नये”

“कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का?”

Web Title: Pankaja Munde first reaction after being elected to the BJP's national executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.