Pankaja munde: ...तर भागवत कराडांच्या शपथविधीला गेले असते; पंकजा मुंडेना 'एकाच' गोष्टीचे शल्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 02:21 PM2021-07-13T14:21:32+5:302021-07-13T14:31:26+5:30

Pankaja munde talk on Bhagvat Karad: जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करणार, मी कुणालाही घाबरत नाही, माझ्यावर निर्भिड राजकारणाचे संस्कार, असे वक्तव्य आज पंकजा मुंडे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांसमोर केले.

Pankaja munde got late information about Bhagvat Karad's swearing of Modi cabinet expanion | Pankaja munde: ...तर भागवत कराडांच्या शपथविधीला गेले असते; पंकजा मुंडेना 'एकाच' गोष्टीचे शल्य

Pankaja munde: ...तर भागवत कराडांच्या शपथविधीला गेले असते; पंकजा मुंडेना 'एकाच' गोष्टीचे शल्य

Next

भागवत कराडांना (Bhagvat Karad) मंत्रिपद दिल्याने नाराज नाही. त्यांच्या शपथविधीलाही गेले असते, परंतू दुर्दैवाने मला हे उशिरा समजले, यामुळे कार्यकर्तेही नाराज झाले, असे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. (Why Pankaja Munde not went to Bhagvat Karad's minister oath?)
Pankaja munde: जेव्हा मला वाटेल, आता राम उरला नाही, तेव्हा...; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे (Pritam munde) यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे (Pankaja munde) आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत. या कार्यकर्त्यांना पंकजा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोरोनाच्या नियमांना हरताळ फासण्यात आला. यावेळी पंकजा यांना बोलताना माईकच्या तांत्रिक बिघाडाला बराचवेळ सामोरे जावे लागले.

जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करणार, मी कुणालाही घाबरत नाही, माझ्यावर निर्भिड राजकारणाचे संस्कार, असे वक्तव्य आज पंकजा मुंडे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांसमोर केले. पक्षाने मला खूप दिलंय, पक्षाने दिलेलं मी लक्षात ठेवते, जे दिलं नाही ते तुम्ही लक्षात ठेवा, असेही त्यांनी सांगितले. याचबरोबर दु:खी चेहऱ्याने आलात, ते माझ्या पदरात टाका आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू तुम्ही घेऊन माघारी जा, असे आवाहन पंकजा यांनी या कार्यकर्त्यांना केले. 

Pankaja munde: ...म्हणून मी तुमचे राजीनामे नामंजूर करते; पंकजा मुंडेंची 'नाराज' मेळाव्यात घोषणा

संघटनेच्या कामासाठी दिल्लीला गेले होते. मला कोणी झापले नाही. मोदींना अत्यंत सन्मानाची वागणूक दिली. वेळ दिला चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर राज्यातील राजकारणाबाबत पंकजा यांनी कोणाचेही नाव न घेता टोले लगावले. यासाठी त्यांनी महाभारतील उदाहरणे दिली. कौरवांसोबत रथी महारथी होते, परंतू ते फक्त शरीराने त्यांच्यासोबत होते. मनाने ते पांडवांसोबत होते. तसेच आहे, माझा नेता मोदी, माझा नेता अमित शाह आणि जे. पी. नड्डा असे सांगत पंकजा यांनी एकप्रकारे राज्यातील नेत्यांना इशारा दिला आहे. 

पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या...
पक्ष संघटनेची चर्चा असल्याने त्याची कुठेही वाच्यता करायची नाही असा नियम असल्याने मी त्यावर बोलणार नाही.  मंत्रिपदाची मागणी केली नाही, त्यामुळे दिल्लीत मला त्यावर बोलावे लागले नाही. फक्त जे पी नड्डांच्या कानावर कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यांची गोष्ट घातली. त्यांनी सांभाळून घेण्य़ास सांगितले, असे पंकजा म्हणाल्या. 
धर्मयुद्धाबाबतही पंकजांनी भाष्य केले. जेव्हा एखादा व्यक्ती राज्यभर प्रवास करून एक संघटना उभी करतो. त्याचा आणि कार्यकर्त्यांमध्ये विसंवाद होतो. आपल्या विचारांशी असलेला संघर्ष होतो. लोकांची जोडलेली मोट सुटू नये यासाठी लढावे लागतेय, असे पंकजा यांनी म्हटले. 
पक्षात राम राहिला नाही, तेव्हा बघू या वक्तव्यावर पंकजा यांना विचारले असता पंकजा यांनी हसत तशी वेळ येवू नये असे म्हणत उत्तर देणे टाळले. 

माझ्या समाजाचा अपमान का करू...
प्रीतम मुंडेंची मंत्रीपदाची कुवत असताना त्यांना मिळाले नाही. आज भागवत कराड यांचे वय ६५, माझे ४२. मग माझ्या समाजाचा अपमान मी कसा करू, असे देखील त्या म्हणाल्या. 

Web Title: Pankaja munde got late information about Bhagvat Karad's swearing of Modi cabinet expanion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.