एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार? पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाल्या...

By प्रविण मरगळे | Published: October 21, 2020 07:42 AM2020-10-21T07:42:05+5:302020-10-21T15:32:55+5:30

BJP Eknath Khadse, Pankaja Munde News: गेल्याच महिन्यात पंकजा मुंडे यांना भाजपाने राष्ट्रीय कार्यकारणीत संधी दिली, त्यानंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात दिसू लागल्या.

Pankaja Munde Reaction on Eknath Khadse Will leave from BJP & Join NCP | एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार? पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाल्या...

एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार? पंकजा मुंडेंनी पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाल्या...

Next
ठळक मुद्देएकनाथ खडसे भाजपातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्याच महिन्यात पंकजा मुंडे यांना भाजपाने राष्ट्रीय कार्यकारणीत संधी दिली, परंतु खडसेंना डावललंचर्चा ऐकायच्या असतात, ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्यावर भाष्य कशाला करायचं? - पंकजा

नांदेड – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहेत, पक्षात सातत्याने डावललं जात असल्याने एकनाथ खडसेभाजपा सोडण्याच्या तयारीत आहेत, त्यासाठी खडसेंनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचंही सांगण्यात आलं आहे, परंतु एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाहीत असा दावा भाजपाचे सर्वच नेते करत आहेत.

भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर चार वर्ष ते मंत्रिमंडळाच्या बाहेर होते, विधानसभा निवडणुकीतही एकनाथ खडसेंना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यानंतर विधानपरिषद जागेसाठीही खडसेंना संधी मिळाली नाही, त्यामुळे नाराज झालेल्या खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उघडपणे भाष्य करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार असल्याची चर्चा सुरु झाली.

एकनाथ खडसे भाजपातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी २२ ऑक्टोबर रोजीचा मुहूर्तही ठरला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे खडसेंबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलण्यात आलं, मागील वेळी पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावरुन एकनाथ खडसेंनी पक्षांतर्गत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पंकजा मुंडेही तेव्हा पक्षाच्या सक्रीय कार्यातून बाहेर पडल्या होत्या.

मात्र गेल्याच महिन्यात पंकजा मुंडे यांना भाजपाने राष्ट्रीय कार्यकारणीत संधी दिली, त्यानंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात दिसू लागल्या. सध्या पंकजा अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी दौरा करत आहेत, यावेळी पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रश्न केला, त्यावर पंकजा म्हणाल्या की, चर्चा चर्चा असताच जोपर्यंत सत्यात उतरत नाही, चर्चा ऐकायच्या असतात, ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्यावर भाष्य कशाला करायचं? मला वाटत नाही खडसेसाहेब पक्ष बदलण्याचा निर्णय घेतील असं त्यांनी प्रतिक्रिया दिली.

नाथाभाऊ पक्ष सोडणार नाही

भाजपचे नुकसान नुकसान होईल असे एकनाथ खडसे कधीही वागणार वागणार नाहीत. पुढील काही दिवसांमध्ये ते पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होतील. ते कुठेही जाणार नाहीत. मात्र यामुळे जे खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे. खडसे प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीलाही उपस्थित होते. आणि ते नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. अन् पुन्हा एकदा ते पक्ष कार्यात पुन्हा सक्रिय होतील असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. खडसेंचं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते, पण दुर्देवाने त्यांची नोंद घेतली नाही असं त्यांना वाटतं, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते असं शरद पवारांनी सांगितल्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले होते.

खडसे पक्षांतर करणार नाही- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकनाथ खडसे आमचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी आमचे सोबत राहीले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण नीट कळते. त्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. तर आज झालेल्या पत्रकार परिषदेतही फडणवीसांना हा प्रश्न विचारला असता, असे मुहूर्त रोज सांगितले जातात, मी त्यावर बोलणार नाही असं सांगत खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाष्य करणं टाळलं.

एकंदर पाहता एकनाथ खडसेंबाबत भाजपा नेते जो दावा करत आहेत, त्याबद्दल आगामी काळात स्पष्ट होईलच, तुर्तास राजकीय वर्तुळात एकनाथ खडसेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Pankaja Munde Reaction on Eknath Khadse Will leave from BJP & Join NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.