Pankaja Munde Video: धनंजयच्या खासगी प्रकरणाचे समर्थन करणार नाही, पण...; पंकजा मुंडेंचे 'रोखठोक' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 07:37 PM2021-06-05T19:37:48+5:302021-06-05T19:46:07+5:30
Pankaja Munde talk on Dhananjay Munde's two marriages issue: राजकीय फायदा, नुकसान हे माझ्या निर्णयावर असेल, हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत, असे उत्तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) दुसऱ्या लग्नाच्या प्रकरणावर दिले आहे.
Pankaja Munde vs Dhananjay Munde: धनंजय आणि आम्ही एकाच परिवारातील आहोत. कोणाही बाबतीत घडले असते तर मी अशीच वागले असते. राजकीय फायदा, नुकसान हे माझ्या निर्णयावर असेल, हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत, असे उत्तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) दुसऱ्या लग्नाच्या प्रकरणावर दिले आहे. (no politics on Dhananjay Munde's two marriages issue, told by Bjp Leader Pankaja Munde.)
कुटुंबामध्ये कोणते वाद झाले तर राजकारण केले नाही, धनंजय मुंडे यांच्या खासगी प्रकरणावेळी तुम्ही मौन बाळगले असे का, असा प्रश्न लोकमत डिजिटलचे संपादक आशिष जाधव यांनी पंकजा मुंडे यांना केला. यावर मी मौन बाळगले नाही, असे उत्तर पंकजा यांनी दिले आहे.
मी कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तीक जीवनामध्ये कधीही सार्वजनिक स्टेटमेंट करत नाही किंवा पाठीमागेही बोलत नाही. हे माझे एक तत्व आहे. कोणाही बाबतीत घडले असते तर मी अशीच वागले असते. धनंजय आणि आम्ही एकाच परिवारातील आहोत. त्यांच्या परिवाराची हानी किंवा संकट असेल त्याचा राजकीय फायदा घ्यावा एवढी छोटी मी नाही. राजकीय फायदा, नुकसान हे माझ्या निर्णयावर असेल, हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत, असे त्या म्हणाल्या.
दुसऱ्याच्या अपयशावर त्याच्या अडचणींवर मला इमारत बांधायची नाही. धनंजय मुंडेंच्या बाबतीत जे घडले त्यावर मी त्याचे समर्थन करू शकत नाही, हे मी स्पष्ट केले आहे. मी जेव्हा जन्मले तेव्हा मी पहिली स्त्री आहे हे निसर्गाकडून समजले, नंतर मी कोणाची मुलगी आहे, माझ्याकडे काय वारसा आहे ते कळले. त्यामुळे मी माझे मत मांडले. मी त्याचा राजकीय फायदा घेण्याचा उद्देश नाही, भूतकाळातही केले नाही, असे पंकजा यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राला विसरून भविष्यात देशाच्या राजकारणात जाणार का या प्रश्नावर त्यांनी, महाराष्ट्राला मी विसरणार नाही, महाराष्ट्र माझी मातृभूमी आहे, कर्मभूमी आहे. भविष्यकार नसल्याने मला पुढचे काही भाकित करता येणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.