...तर आदरणीय शरद पवारांना जाब विचारायला हवा; काँग्रेस नेत्याचा थेट हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 08:31 AM2021-03-21T08:31:58+5:302021-03-21T08:32:54+5:30

congress leader sanjay nirupam takes dig at ncp chief sharad pawar: काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा थेट शरद पवारांवर निशाणा; काँग्रेस नेत्यांनी ठोस भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त

param bir singh letter congress leader sanjay nirupam takes dig at ncp chief sharad pawar | ...तर आदरणीय शरद पवारांना जाब विचारायला हवा; काँग्रेस नेत्याचा थेट हल्लाबोल

...तर आदरणीय शरद पवारांना जाब विचारायला हवा; काँग्रेस नेत्याचा थेट हल्लाबोल

Next

मुंबई: मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ माजली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी पत्रात केला आहे. त्यांच्या या पत्रामुळे राज्यात भूकंप झाला आहे. तर अनिल देशमुख यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

"आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता"

परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. शरद पवार यांना या सगळ्याची कल्पना होती, असं परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केलं आहे. यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. 'परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास, त्यांचे दावे खरे असल्यास आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा. कारण तेच महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत. तथाकथित तिसरी आघाडी हेच करणार आहे का?', असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसनं या विषयात ठाम भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. 

मनसुख हिरेन यांची हत्या?; अनिल देशमुख यांच्या ट्विटमधील 'त्या' शब्दाने भुवया उंचावल्या

शरद पवारांच्या 'त्या' विधानाचा निरुपम यांच्याकडून समाचार
केरळमधील काँग्रेस नेते पी. सी. चाको यांनी १० मार्चला पक्षाला रामराम केला. चारच दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीवर भाष्य केलं. देशाला तिसऱ्या आघाडीची गरज आहे. यासंदर्भात काही नेत्यांशी माझं बोलणं झालं आहे. सीपीआय एमचे प्रमुख सीताराम येचुरी यांनी याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे, असं पवार यांनी सांगितलं होतं. आता निरुपम यांनी तिसरी आघाडी हेच करणार आहे का, असा सवाल करत थेट पवारांना लक्ष्य केलं आहे.

वाझे प्रकरण म्हणजे सरकार पुरस्कृत वसुली कांड
संजय निरुपम यांनी आधीही सचिन वाझे प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. 'या प्रकरणात आयुक्तांची चूक होती या गृहमंत्र्यांच्या विरोधाभासी विधानामुळे सरकारची प्रतिमा आणखी मलीन होईल. वाझे प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासातून हे सरकार पुरस्कृत हफ्ता वसुली कांड असल्याचं दिसून येतं. याचे धागेदोरे शिवसेनेपर्यंत जातात का?', असा प्रश्न निरुपम यांनी ट्विट करून उपस्थित केला होता.

Web Title: param bir singh letter congress leader sanjay nirupam takes dig at ncp chief sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.