पक्षाने उमेदवारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढविणार- पार्थ पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 02:21 AM2019-01-21T02:21:36+5:302019-01-21T02:22:04+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिल्यास मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणूक लढविणार, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सांगितले.
वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिल्यास मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणूक लढविणार, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सांगितले. पार्थ पवार व सुमित्रा पवार यांनी रविवारी मावळात कार्यक्रमांस हजेरी लावली.
जिल्हा परिषदेचे सदस्य बाबूराव वायकर यांच्या फंडातून तेवीस गावांत करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन पार्थ पवार व सुमित्रा पवार यांच्या हस्ते झाले. तसेच शेतकºयांच्या आत्महत्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी नायगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे देवा गायकवाड मित्र मंडळाने पाच हजार महिला शिर्डी येथे साईबाबाला साकडे घालण्यासाठी नेल्या. या महिलांना या वेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे उपस्थित होते.
पार्थ पवार यांनी मावळात दुसºयांदा हजेरी लावली. रविवारी त्यांच्याबरोबर त्यांच्या मातोश्री सुमित्रा पवार यांनीही हजेरी लावल्याने तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीत बिगुल वाजल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसले आहे.
>कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे लोणावळा, वडगाव येथे हजेरी लावली. लोकांबरोबर संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी दौरा सुरू केला आहे. भाजपा शासनाने साडेचार वर्षांत राज्याची पूर्ण वाट लावून टाकली आहे. आगामी निवडणुकीत जनता या घरी पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही, मला उमेदवारी मिळावी, यासाठी मी प्रयत्न करत नाही, पक्ष देईल त्या उमेदवारासाठी संपूर्ण मतदारसंघात प्रचार करणार आहे. पक्षाने मला लोकसभेची उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढविणार असे त्यांनी सांगितले. - पार्थ पवार