Cabinet Expansion: “चिराग नाही, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी”: पशुपती कुमार पारस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 09:46 PM2021-07-08T21:46:46+5:302021-07-08T21:49:07+5:30
Cabinet Expansion: पदभार स्वीकारल्यावर पशुपती कुमार पारस यांनी पुतणे चिरास पासवान यांना खडेबोल सुनावत, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रिमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे. यामध्ये पशुपती कुमार पारस यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यावर पशुपती कुमार पारस यांनी पुतणे चिरास पासवान यांना खडेबोल सुनावत, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी असल्याचे म्हटले आहे. (pashupati kumar paras says i am the real political successor of ram vilas paswan)
दिवंगत केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर लोक जनशक्ती पक्षात मोठ्या प्रमाणावर गटबाजी झाल्याचे समोर आले. चिराग पासवान आणि काका पशुपती कुमार पारस यांच्यातील वाद वाढले. मात्र, आता केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या पारस यांनी चिराग पासवान यांना चांगलेच सुनावले आहे. मीच रामविलास पासवान यांना खरा राजकीय वारसदार आहे. चिराग नाही, असे पारस यांनी म्हटले आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे शक्य!; RBI गव्हर्नरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
आपल्या चुकांबाबत आत्मचिंतन करावे
चिराग पासवान राम विलास पासवान यांच्या संपत्ती, मालमत्ताचे वारसदार असू शकतात. मात्र, खरा राजकीय उत्तराधिकारी मीच आहे. चिराग पासवान यांनी आपल्या चुकांबाबत आत्मचिंतन करावे. राम विलास पासवान माझे आदर्श आहेत, असे पारस यांनी स्पष्ट केले आहे. तसेच केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी देत विश्वास ठेवल्याबाबत पारस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. आगामी कालावधीत मंत्रालयाचे कामकाज समजून घेऊन व्हिजन आणि कार्यक्रमांची रुपरेषा तयार करणार असल्याचे पारस यांनी नमूद केले.
“केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज”
चेहरे बदल्यामुळे परिस्थिती बदलणार का?
मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, यामुळे देशभरात व्यापक प्रमाणात असलेली गरिबी, बेरोजगारी, महागाई, कुपोषण, आरोग्य सेवा आणि चांगल्या शिक्षणाचा अभाव, शेतकऱ्यांवरील संकट, भ्रष्टाचार, दलित आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचार यांसारख्या समस्या दूर होणार आहेत का, याचे उत्तर नकारार्थीच आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार हे केवळ एक नाटक आहे, अशी टीका निवृत्त न्या. मार्कंडेय काटजू यांनी केली आहे.