Bihar Assembly Election Result : "जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारलं"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 08:44 AM2020-11-11T08:44:37+5:302020-11-11T08:57:35+5:30
Bihar Assembly Election Result And Amit Shah : निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
पाटणा - बिहारमध्ये मतदारांनी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला सलग चौथ्यांदा पसंती दर्शवली असली तरी 20 वर्षांनंतर प्रथमच भाजपाबिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गेल्यावेळी भाजपाला 53 जागा मिळाल्या होत्या. आतापर्यंतच्या बिहारी राजकारणात रालोआमध्ये नितीशकुमार यांचे वर्चस्व होते. जदयुला सतत मिळत असलेल्या अधिक जागा, हे त्याचे कारण होते. त्यामुळे भाजपानेही लहान भावाची भूमिका स्वीकारली होती. परंतु आता भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने तेथील गणिते बदलू शकतात. निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. "बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासन यांची पुन्हा निवड करण्यासाठी मी बिहारच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो" असं म्हटलं आहे. तसेच बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारत एनडीएच्या विकासवादाची निवड केली असं देखील शहा यांनी म्हटलं आहे. "बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासन यांची पुन्हा निवड करण्यासाठी मी बिहारमधील सर्वांचे आभार मानतो. मुख्यत: बिहारचे तरूण आणि महिलांना धन्यवाद देतो ज्यांनी बिहारची सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्यासाठी एनडीएला बहुमत मिळवून दिलं" असं ट्विट अमित शहा यांनी केलं आहे.
बिहार के हर वर्ग ने फिर एक बार खोखलेवादे, जातिवाद और तुष्टिकरण की राजनीति को सिरे से नकार कर NDA के विकासवाद का परचम लहराया है।
— Amit Shah (@AmitShah) November 10, 2020
यह हर बिहारवासी की आशाओं और आकांक्षाओं की जीत है...@narendramodi जी और @nitishkumar जी के डबल इंजन विकास की जीत है।@BJP4Bihar के कार्यकर्ताओं को बधाई।
"हा प्रत्येक बिहारवासीयाच्या आशा आणि आकांक्षांचा विजय"
"बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारत एनडीएच्या विकासवादाची निवड केली आहे. हा प्रत्येक बिहारवासीयाच्या आशा आणि आकांक्षांचा विजय आहे. या निवडणुकीमध्ये जनतेने ज्या उत्साहानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या धोरणांना समर्थन दिलं ते नक्कीच उल्लेखनीय आहे. या निकालामुळे मोदी सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या यशस्वी लढाईत गरीब, मजूर, शेतकरी आणि तरूण वर्गाचा विश्वास दिसून आलाच, पण त्याचबरोबर देशाची दिशाभूल करणाऱ्यांनाही धडा मिळाला" असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.
इन चुनावों में जनता ने जिस उत्साह से @narendramodi जी और NDA की नीतियों में अपना समर्थन जताया वो सचमुच अद्भुत है।
— Amit Shah (@AmitShah) November 10, 2020
यह परिणाम न सिर्फ कोरोना के विरुद्ध मोदी सरकार की सफल लड़ाई में गरीब, मजदूर, किसान और युवाओं के विश्वास को दिखता है बल्कि देश को गुमराह करने वालों के लिए सबक भी है।
20 वर्षांनी भाजपा मोठा भाऊ; बिहारमध्ये अनेक वर्षांनी मिळाले भरघोस यश
20 वर्षांनंतर प्रथमच सर्वाधिक जागा मिळविण्यात यशस्वी ठरलेला भाजपा आता मोठ्या भावाची भूमिका निभावू शकतो. दोन दशकांत नितीशकुमार यांनी भाजपाच्याच बळावर बिहारमध्ये सत्ता मिळवली परंतु भाजपाला त्यांनी कधीही लहान भाऊ मानले नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या 20 वर्षांतील चित्र पाहणे उद्बोधक ठरेल. पृथ्वीवरुन अंतराळातील उपग्रह नियंत्रित करता येतात, तर मग मतदान यंत्र हॅक का होऊ शकत नाही, असा दावा करुन काँग्रेस नेते उदीत राज यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाने हा दावा खोडून काढला. ही यंत्रणा विश्वसनीय व सक्षम असल्याचे आयोगाने म्हटलं आहे.