"काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत", संजय राऊतांचा भाजपाला सूचक इशारा

By बाळकृष्ण परब | Published: January 15, 2021 04:43 PM2021-01-15T16:43:21+5:302021-01-15T16:47:49+5:30

Sanjay Raut News : एकीकडे विरोधी पक्षात असलेल्या भाजपाकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना महाविकास आघाडीकडून मात्र त्यांच्या बचावाचा प्रयत्न केला जात आहे.

"People living in glass houses should not throw stones at others", Sanjay Raut warns BJP | "काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत", संजय राऊतांचा भाजपाला सूचक इशारा

"काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत", संजय राऊतांचा भाजपाला सूचक इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देकाचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारण्याचा प्रयत्न करू नयेएखादा दगड तुमच्या काचेच्या घरावर बसला तर तुमचा काच महाल खाली येईलशीशे के घरमे रहनेवाले दुसरों पर पत्थर फेंका नही करते, हा मंत्र देशातील सर्व राजकारण्यांना लागू होतो

मुंबई - एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्य सरकारमधील समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडेंवरून सध्या राजकारण जोरात सुरू आहे. एकीकडे विरोधी पक्षात असलेल्या भाजपाकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना महाविकास आघाडीकडून मात्र त्यांच्या बचावाचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून भाजपासह विरोधकांना एक सूचक इशारा दिला आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरांवर दगड मारू नयेत, असा सल्लावजा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले की,  ''काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. एखादा दगड तुमच्या काचेच्या घरावर बसला तर तुमचा काच महाल खाली येईल. शीशे के घरमे रहनेवाले दुसरों पर पत्थर फेंका नही करते, हा मंत्र देशातील सर्व राजकारण्यांना लागू होतो, असा सूचक सल्ला संजय राऊत यांनी दिला.

तसेच धनंजय मुंडेंनी केलेल्या आरोपांचीही तटस्थपणे चौकशी करणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले. धनंजय मुंडेंवर आरोप झाल्यापासून शिवसेनेने धनंजय मुंडेंचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. प्यार किया तो डरना क्या म्हणत शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मुंडेंची बाजू घेतली होती. तर आरोप झाले म्हणून धनंजय मुंडे यांना फाशी देणार का असा सवाल, अनिल परब यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, याबाबत बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कायद्यापुढे कोणताही मंत्री मोठा नाही, कायद्यासमोर सर्व समान असतात. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरु आहे, असे सांगितले. कायदा कुणासोबतही भेदभाव करणार नाही. दोषींवर योग्य ती कारवाई करू. कायद्यापुढे कोणताही मंत्री किंवा संत्री मोठा नाही. कायद्यासमोर सर्व समान असतात. सध्या धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरु आहे. यामधून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी म्हटले म्हटले आहे. याचबरोबर, या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार? असा प्रश्न विचारला असता याचे उत्तर देणे अनिल देशमुख यांनी  टाळले आणि चौकशीतून सर्व माहिती पुढे येईलच, असे सांगितले.

Web Title: "People living in glass houses should not throw stones at others", Sanjay Raut warns BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.