लोकशाहीवर आघात करणाऱ्या करणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 21:02 IST2021-02-04T21:02:09+5:302021-02-04T21:02:15+5:30
देशातील सध्यपरिस्थितीवर शरद पवारांचं सूचक विधान

लोकशाहीवर आघात करणाऱ्या करणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला- शरद पवार
नवी दिल्ली: केंद्राचे कृषी कायदे आणि त्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे. देशात लोकशाहीचा विचार रुजला आहे. त्यामुळे लोकशाहीच्या विरोधात वर्तन करणाऱ्या कोणत्याही पक्षाला देशातील जनतेनं सोडलेलं नाही. त्यांना धडा शिकवला आहे, असं शरद पवार म्हणाले. सध्या देशात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पवार यांचं हे विधान अतिशय सूचक मानलं जात आहे.
एका पदावरून तीन पक्षांत रंगणार रस्सीखेच; 'पॉवर'फुल विधानामुळे महाविकास आघाडीत नवा पेच?
पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी इतिहासातील महत्त्वाचे दाखले दिले. आणीबाणीच्या कालखंडात लोकशाहीच्या बाजूनं उभ्या राहिलेल्या हजारो लोकांना अटक झाली. त्या कालावधीत जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली चळवळ उभी राहिली. पुढील निवडणुकीत पंतप्रधान इंदिरा गांधींचा पराभव झाला. त्यांना सत्ता सोडावी लागली. इंदिरा गांधींसारख्या मातब्बर नेतृत्त्वालादेखील जनतेनं धडा शिकवला, असं पवार म्हणाले.
".. पण आंदोलनकर्त्यांना १० एकरात १०० कोटींची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या"
देशातील जनतेच्या मनात लोकशाहीबद्दल श्रद्धा आहे. त्यामुळे लोकशाहीला नख लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनताच बाजूला करते. लोकशाहीला धोका पोहोचवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवता आलं. लोकशाहीसाठी असे प्रयोग देशात होण्याची गरज असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं.