जळगावमध्ये भाजपाच्या फुटलेल्या 27 नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका, पक्षादेशाचा भंग केल्याचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 13:47 IST2021-03-31T13:43:21+5:302021-03-31T13:47:15+5:30
Jalgaon BJP And Shivsena : महापौर व उपमहापौर पदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या सत्तावीस नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप न जुमानता शिवसेनेशी हातमिळवणी केली.

जळगावमध्ये भाजपाच्या फुटलेल्या 27 नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका, पक्षादेशाचा भंग केल्याचा ठपका
नाशिक- जळगावच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत फुटलेल्या 27 नगरसेवकांना धडा शिकविण्यासाठी भाजपाने तयारी केली असून पक्षादेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत या सर्व नगरसेवकांना अपात्र ठरवावे यासाठी आज नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आले आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या सत्तावीस नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप न जुमानता शिवसेनेशी हातमिळवणी केल्याने भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार प्रतिभा कापसे व उपमहापौर पदाचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा पराभव झाला होता महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन व उपमहापौरपदी भाजपाचे बंडखोर कुलभूषण पाटील हे विजयी झाले होते भाजपाच्या सत्तावीस नगरसेवकांनी पक्षादेश न जुमानता पक्षाशी गद्दारी केल्याने त्यांचे नगरसेवक पद करण्यात यावे याकरता जळगाव मनपा भाजपा गटनेता भगत बालानी यांनी आज दुपारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे याचिका दाखल केली.
शिवसेनेच्या गोटात सहभागी झाल्यानंतर या नगरसेवकांना भाजपाने प्रत्यक्ष, मोबाईल, Whatsapp, वृत्तपत्र अशा वेगवेगळ्या माध्यमातून सहा प्रकारे पक्षादेश बजावला होता मात्र त्याचे उल्लंघन केल्याचा भाजपाचा आरोप आहे.