हिंदू खतरे में है! हिंदू सण, संस्कृतीवर ठाकरे सरकारच्या मदतीनं नियोजित हल्ला; भाजपा आमदाराचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 12:33 PM2021-08-06T12:33:29+5:302021-08-06T12:35:20+5:30
BJP Target Shivsena Over Hindutva: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव दहीहंडी सारख्या सणांवर ठाकरे सरकारकडून अनेक निर्बंध लादले जात आहे.
मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपा सातत्याने शिवसेनेवर हल्लाबोल करत आहे. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाबद्दल मवाळ भूमिका घेतली आहे असं आरोप होतो. आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव दहीहंडी सारख्या सणांवर ठाकरे सरकारकडून अनेक निर्बंध लादले जात आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं की, हिंदू समाज, हिंदू सण, हिंदू संस्कृतीवर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत. महाराष्ट्र सरकारच्या मदतीनं हे हल्ले होत असल्याचं गंभीर आरोप त्यांनी केला. असंख्या घटना कानावर येत आहेत. पश्चिम बंगालसारखं मुंबईत राहणारा "हिंदू खतरे में है" असं सांगण्याची वेळ आली आहे असं म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेचं नाव न टोला लगावला.
ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो
अलीकडेच ब्रेक द चैन अंतर्गत नवी नियमावली काढण्यात आली. यात प्रार्थनास्थळांसाठी शिथिलता देण्यास ठाकरे सरकार तयार नसल्याचे सांगितले जात आहे. यावरून भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. सगळे खुले केले मग मंदिर का बंद अशी विचारणा करत मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. आता सगळे काही सुरू झालेले असताना, मंदिरे उघडण्याचा निर्णय देतीख सरकारने घ्यावा. हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू होतोय. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिर खुली करा आणि भाविकांना दर्शन घेऊ द्या, सगळे खुल झाले, मग मंदिर बंद नकोत, अशी आग्रही मागणी आचार्य तुषार भोसले यांनी करत लसीकरण झालेल्या भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेऊ द्यावे, अशी आग्रही मागणी केली.
हिंदुत्त्व म्हणजे पेटंट कंपनी नाही
मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी, हिंदुत्त्वासाठी मी नक्कीच लढेल. हिंदुत्व आमचा देशाभिमान आहे, त्यानंतर प्रादेशिक अस्मिता असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. आपलं राजकारण सोडून देशावर प्रेम करणारा शिवसेने एवढा दुसरा पक्ष नाही. हिंदुत्व म्हणजे पेटंट कंपनी नाही, हे माझचं म्हणजे हिंदुत्त्व नाही. हिंदुत्व म्हणजे आमचा श्वास आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात भाजपाला लगावला होता.