"भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहा" 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 12:08 PM2021-05-29T12:08:25+5:302021-05-29T12:11:43+5:30

TMC Mahua Moitra Slams BJP And Narendra Modi : भाजपाकडून ममतांवर हल्लाबोल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाला आता प्रत्युत्तर दिलं आहे. 

pm modi mamata banerjee 30 minutes late review meeting tmc mp mahua moitra tweet | "भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहा" 

"भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहा" 

Next

नवी दिल्ली - यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालमधील भागाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी दौरा केला. यानंतर आढावा बैठकही घेतली. मात्र, यावेळीही ममता बॅनर्जी सरकार आणि केंद्रातील वाद शमलेला दिसला नाही. यास चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी, राज्यपाल जयदीप धनखर यांना ताटकळत ठेवल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली. यावरून भाजपा नेत्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे. भाजपाकडून ममतांवर हल्लाबोल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (TMC Mahua Moitra) यांनी भाजपाला आता प्रत्युत्तर दिलं आहे. 

"भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; तुम्हीही थोडी वाट पाहा" असं म्हणत मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. महुआ मोईत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. "30 उशीर झाल्याच्या कथित विलंबावरून इतका गोंधळ? भारतीय 15 लाख रुपयांची सात वर्षांपासून वाट पाहत आहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास वाट बघत आहेत. लसीसाठी अनेक महिन्यांपासून वाट बघावी लागत आहेत. कधी कधी थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा" असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. 

“देशाच्या पंतप्रधानांशी असा व्यवहार वेदनादायी”; राजनाथ सिंहांनी ममता दीदींना सुनावले

राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पश्चिम बंगालमधील घटनाक्रम धक्कादायक आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान व्यक्ती नसून संस्था आहेत. दोघांनी जनतेच्या सेवेचा संकल्प आणि संविधानाबद्दल निष्ठा ठेवण्याची शपथ घेऊनच पदग्रहण केले आहे. संकटाच्या काळात जनतेला मदत देण्याच्या भावनेने आलेल्या पंतप्रधानांसोबत अशा प्रकारचा व्यवहार वेदनादायी आहे. जनतेच्या सेवेचा संकल्प आणि संविधानाने दिलेल्या कर्तव्यांच्या वर राजकीय मतभेदांना ठेवण्याचे हे एक दुर्दैवी उदाहरण आहे. हे भारतीय संघव्यवस्थेच्या भावनेला धक्का पोहोचवणारे आहे, असे ट्विट राजनाथ सिंह यांनी करत ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. 

"रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात, तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतलेत"

बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महुआ मोईत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. "स्वामी रामदेव यांना कुणाचा बापही अटक करू शकत नाही. रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत" असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी रामदेव बाबांवर टीकास्त्र सोडलं आहे. 

Web Title: pm modi mamata banerjee 30 minutes late review meeting tmc mp mahua moitra tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.