पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात १६ जुलैला महत्त्वाची बैठक; VC द्वारे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 05:16 PM2021-07-13T17:16:33+5:302021-07-13T17:20:41+5:30

PM Narendra Modi And CM Uddhav Thackeray Will Meet: येत्या १६ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात महत्त्वाची चर्चा होईल.

PM Narendra Modi to meet CM Uddhav Thackeray, to review Corona Situation and vaccination Drive | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात १६ जुलैला महत्त्वाची बैठक; VC द्वारे चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात १६ जुलैला महत्त्वाची बैठक; VC द्वारे चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देदेशातील ६ राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राज्यात सुरू आहेत विविध चर्चा

नवी दिल्ली – देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे(Coronavirus Third Wave) खबरदारी घेण्यात येत आहे. दुसरी लाट ओसरत असताना बऱ्याच राज्यांनी अनलॉकच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यात केंद्र सरकारने राज्यांना सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार आहेत.

येत्या १६ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात महत्त्वाची चर्चा होईल. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. देशातील ६ राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच तामिळनाडूचे एम के स्टॅलिन, आंध्र प्रदेशचे वाय. एस जगनमोहन रेड्डी, कर्नाटकचे बी.एस येडियुरप्पा, ओडिशाचे नवीन पटनायक, केरळचे पिनरई विजयन यांच्यासोबतही पंतप्रधान संवाद साधणार आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र तयार

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिक चक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.

सुमारे १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन राज्यात केले जाते. येणाऱ्या काळात कोविडचे आव्हान अधिक वाढले तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे. उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

तसेच छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये कोविडपासून प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्यामाध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्यादृष्टिने नियोजन करावे, कामांच्या पाळ्या अशारीतीने निश्चित कराव्यात की, गर्दी होणार नाही व कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही हे पाहावे असेही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिलेत. डेल्टाच्या नव्या उत्परीवर्तीत विषाणूमुळे अधिक काळजी घ्यावी लागणार असून अनेक देशांनी परत निर्बंध लावण्यास व काळजी घेण्यास सुरुवात केली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आणखी काही महिने तरी आपल्याला मास्क नियमित वापरणे, हात सातत्याने धुत राहणे, अंतर पाळणे व स्वच्छता ठेवणे याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे लागणार आहे असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.

Web Title: PM Narendra Modi to meet CM Uddhav Thackeray, to review Corona Situation and vaccination Drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.