अडवाणींनी खेचले कान, मोदींनी केला शाब्दिक सन्मान!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 10:30 PM2019-04-04T22:30:05+5:302019-04-04T22:31:24+5:30

भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी ब्लॉग लिहून सध्याच्या भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

pm narendra modi on veteran bjp leader lk advani advani ji perfectly sums up the true essence of bjp | अडवाणींनी खेचले कान, मोदींनी केला शाब्दिक सन्मान!

अडवाणींनी खेचले कान, मोदींनी केला शाब्दिक सन्मान!

Next

नवी दिल्ली- भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी ब्लॉग लिहून सध्याच्या भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. लालकृष्ण अडवाणींनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये राजकीय विरोधकांना शत्रू समजत नसल्याचं म्हटलं आहे. भिन्न विचारसरणीच्या व्यक्तींना आम्ही शत्रू नव्हे, तर विरोधक मानतो, असं त्यांनी लिहिलं होतं, त्यावर मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी ट्विट करत म्हटलं की, अडवाणींनी भाजपाची मूळ भूमिका व्यक्त केली. अडवाणींनी भाजपाचा खरा सारांश सांगितला आहे. खरं तर अडवाणींनी देश पहिला, त्यानंतर पक्ष अन् शेवटी स्वतः , या मंत्राचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.

भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा मला गर्व आहे आणि लालकृष्ण अडवाणींसारख्या महान नेत्यानं भाजपा हा पक्ष मजबूत केला, याचाही मला अभिमान आहे.  तत्पूर्वी अडवाणींनी भाजपा स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर ब्लॉग लिहिला असून, 6 एप्रिलला भाजपाचा 39वा स्थापना आहे. अडवाणी लिहितात,  'देश प्रथम, पक्ष नंतर आणि अखेर स्वत:,' या शीर्षकानं अडवाणींनी ब्लॉग लिहिला. राजकीय विरोधकांना शत्रू समजण्याची भाजपाची संस्कृती नाही, असं मत व्यक्त करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 'आमच्या मतांपासून फारकत घेणाऱ्या, आमचे विचार पटत नसलेल्यांना आम्ही कधीच शत्रू मानलं नाही. आम्ही त्यांना केवळ विरोधकच समजलं,' असं अडवाणींनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. कित्येक महिने जाहीर सभांमधून भाषणं न करणाऱ्या, संसदेतही मौन बाळगणाऱ्या अडवाणींनी ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.


काँग्रेसनं त्यांच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचं कलम हटवण्याचं आश्वासन दिलं. त्यावरून सुरू असलेल्या राजकारणारदेखील अडवाणींनी ब्लॉगमध्ये भाष्य केलं. 'भारतीय राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेनुसार, आम्हाला राजकीय विरोध करणाऱ्यांना आम्ही कधीही देशद्रोही म्हटलं नाही.
प्रत्येक नागरिकाला विचार स्वातंत्र्य आहे. वैयक्तिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर प्रत्येक नागरिक स्वतंत्र आहे, असं पक्ष मानतो,' अशा शब्दांमध्ये अडवाणींनी मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. मोदींनी अनेकदा त्यांच्या सभांमध्ये 'काँग्रेसमुक्त भारत'चा पुनरुच्चार केला आहे. त्याचवरुन अडवाणींनी मोदींचं नाव न घेता त्यांना लक्ष्य केल्याचं बोललं जातं आहे.

  

Web Title: pm narendra modi on veteran bjp leader lk advani advani ji perfectly sums up the true essence of bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.